शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी भिडे यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला भीम आर्मीचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 18:24 IST

सभा रद्द करण्याची पोलीस आयुक्तांकडे पत्र देवून केली मागणी

ठळक मुद्देभीम आर्मीने विरोध करत मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि  सुव्यवस्था) यांना पत्र देऊन कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली भिडे यांच्या येण्यामुळे आपल्या शहरात काही समाज कंटकांकडून कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते भाजी भिडे यांच्या कार्यक्रमास परवानगी नाकारावी अशी विनंती भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी केली आहे. 

मुंबई - संभाजी भिडे यांची येत्या रविवारी लालबागमधील गणेश गल्लीतील गणेश मैदान येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुंबई या संस्थेमार्फत व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. मात्र, या व्याख्यानाला भीम आर्मीने विरोध करत मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि  सुव्यवस्था) यांना पत्र देऊन कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

संभाजी भिडे हे नेहमीच जातीवाचक भाष्य करून २ समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत असते व तरुणांना चुकीचा जातीवर आधारित इतिहास सांगून त्यांना भडकविण्याचे काम करत असतात. तसेच ते आपल्या वादग्रस्त भाषणांनकरिताही प्रसिद्ध आहेत. वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या भीमा-कोरेगाव दंगलीमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे यंदाचा भीमा-कोरेगाव मानवंदना दिवस देखील जवळ येऊन ठेपला असताना भिडे यांची मुंबईसारख्या सुरक्षित आणि शांतता प्रिय शहरात सभा होणे हे शहराच्या एकात्मतेकरता फारच धोक्याचे आहे असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. देशातील ही एकंदर वातावरण पाहता असुरक्षिततेची भावना सामान्य माणसाच्या मनात घर करून बसली आहे. अशा वातावरणात सदर व्यक्तीस येण्याची परवानगी देणे म्हणजे विस्तवाला हवा देण्यासारखे होईल. भिडे यांच्या येण्यामुळे आपल्या शहरात काही समाज कंटकांकडून कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते अशी माहिती या पत्रातून देण्यात आली आहे.  

लालबाग येथे होऊ घातलेल्या कार्यक्रमात काही वादग्रस्त विधान होऊन त्याचे परिणाम शहरातील सामान्य जनतेस भोगायला लागू नयेत या करिता दक्षता घेणे गरजेचे आहे आणि म्हणूनच या सर्व गोष्टी टाळण्याकरिता आणि आपल्या शहराची शांतता व एकता सदैव अबाधित राहाण्याकरिता सावधगिरीचा उपाय म्हणून संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमास परवानगी नाकारावी अशी विनंती भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी केली आहे. 

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी