शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! घरकाम करायला बाई ठेवताय?; चोरट्या बाईच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 22:07 IST

नोकराने केला विश्वासघात; लाखोंचा लावला होता चुना 

मुंबई - चिंचपोकळी परिसरातील शांती कमल सोसायटीत राहणाऱ्या धीरजकुमार संघवी (वय - ४१) यांना त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या बाइने ४२ लाख ८० हजारांना काल चुना लावला होता. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सोसायटीने ठेवलेल्या घरकाम करणाऱ्या महिलांच्या माहितीमुळे पोलिसांना या गुन्हांचा छडा फार कमी वेळेत लावला आला. पोलिसांनी कल्याण येथील आंबोली परिसरातील बनेली गावातून तुकतुकी राजेश शेख (वय - २६) या महिलेला अटक केली आहे. 

गेल्या पाच दिवसांपासून धीरजकुमार हे धार्मिक कामानिमित्त राजस्थान येथे आपल्या गावी गेले होते. काल दुपारी धीरजकुमार यांची पत्नी मुलीला शाळेत सोडण्यास गेली होती. घरात कोणीही नसल्याचे पाहून तुकतुकीने संघवी यांच्या घरातील ४० लाख ८० हजारांचे दागिने आणि २ लाखांची  रोकड लंपास केली. याबाबत काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सोसायटीकडे जमा असलेले तुकतुकीचे आधारकार्डची झेरॉक्स आणि मोबाईल क्रमांक मिळविला. त्यानुसार तपासास वेग आला. मोबाईल बंद असल्याने आधारकार्डवरील पत्ता पोलिसांनी गाठला जेथे तुकतुकी राहत होती. तो पत्ता होता कुर्ला इथला. मात्र, घरातील सामान गायब करून बंद करण्यात आले होते. तेथे चौकशी केल्यानंतर कल्याण येथील तुकतूकीचा पत्ता सापडला. कल्याण येथून तुकतुकी आणि तिचा पती राजेश शेख जो बांधकाम साईट्सवर काम करतो तो मिळून पश्चिम बंगला येथे आपल्या गावी पळून जाणार होते. पण, तितक्यातच पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी दिली. तिच्याकडून सर्व दागिने आणि काही रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. काही रक्कम तुकतुकीने साडी आणि राजेश कपडे खरेदी करण्यासाठी वापरले असल्याची माहिती हिरे यांनी दिली. 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईPoliceपोलिसArrestअटकkalyanकल्याण