शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत घाण करताय तर सावधान; तुमच्यावर दाखल होणार गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 20:42 IST

पालिका आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी 'कचरा मुक्त अभियान' सुरू करण्यात आलं आहे.

ठळक मुद्देमुंबईत महापालिकेच्या २४ वॉर्डात आता मुंबईच्या ९४ पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीने प्रत्येक शनिवारी आणि रविवार स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. मुंबई पोलीस थेट पोलीस अधिनियम १९५१ नुसार कलम २२ व नियम ११५ अंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई केली जाणार असल्याचे बर्वे यांनी सांगितले. 

मुंबई - रस्ते, नाले आणि सार्वजनिक परिसर घाण करणाऱ्यांवर आता मुंबई पोलीस थेट गुन्हा नोंदवणार आहेत. पालिका आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी 'कचरा मुक्त अभियान' सुरू करण्यात आलं आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिली.

मुंबईत महापालिकेच्या २४ वॉर्डात आता मुंबईच्या ९४ पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीने प्रत्येक शनिवारी आणि रविवार स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. या स्वच्छता मोहिमेत स्थानिक पोलीस ठाणे आणि पालिका कर्मचारी असं २०० जणांचं पथक प्रत्येक वॉर्डात साफसफाई करणार आहे. या मोहिमेअंतर्गत झोपडपट्टी परिसर, नाल्यालगतच्या वस्त्यांमध्ये पोलीस आणि पालिका कर्मचारी मोठ्या साफसफाई मोहिम राबवणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत क्लिन-अप मार्शल आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने नाल्यात, उघड्यावर घाण टाकणारे, थुंकणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर आता मुंबई पोलीस थेट पोलीस अधिनियम १९५१ नुसार कलम २२ व नियम ११५ अंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई केली जाणार असल्याचे बर्वे यांनी सांगितले. 

मुंबईतील मंदिरं, रस्त्यावरील नाके, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी पाळीव जनावरांना बांधून त्यांना त्याच ठिकाणी चारा दिला जातो. त्या जनावरांची विष्ठा व मलमूत्रामुळे तो परिसर अस्वच्छ होतो आणि मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. त्यामुळे भाजप नगरसेविका नेहला शहा यांनी महापालिका प्रशासनाकडे अशा लोकांवर कारवाईचा बडगा उभागण्याची मागणी केली होती. त्याला महापालिका प्रशासनानं सहमती दर्शवली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्यांमुळे होणाऱ्या अस्वच्छतेस कारणीभूत ठरणाऱ्यांवर १० हजार रुपये महापालिका दंड आकारणार आहे. तर लहान जनावरांसाठी ६ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

टॅग्स :Sanjay Barveसंजय बर्वेMumbaiमुंबईPoliceपोलिसMuncipal Corporationनगर पालिका