शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

अनाेळखी मुलीची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 11:44 AM

Beware if receives an unknown girl's friend request on Facebook : त्यांच्या जाळ्यात अनेक जण फसतात़ तसेच त्यांनी मागितलेले पैसे अनेक जण देऊन टाकतात.

ठळक मुद्देसेक्सटाॅर्शनचे प्रकार वाढले ब्लॅकमेल करून सुरू हाेते पैशांची मागणी

अकोला : सर्वसामान्य लाेकांची विविध मार्गांनी फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी नवीनच प्रकार सुरू केला आहे. फेसबुकवरून मुलीच्या नवाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्यानंतर व्हाॅट्सॲप क्रमांकाची मागणी केली जाते. त्यानंतर व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग सुरू हाेते. जिल्ह्यात अशी तक्रार दाखल झाली नसली तरी अनेक जणांची अशी फसवणूक झाली आहे. बदनामीच्या भीतीने कुणीही तक्रार करण्यास येत नसल्याचे चित्र आहे. सायबर सेलने याविषयी नागरिकांची ऑनलाईन जागृती सुरू केली आहे.

ऑनलाईन फसवणुकीसाठी सायबर गुन्हेगार विविध फंडे वापरतात. गत काही वर्षांपासून फसवणुकीच्या या प्रकाराबाबत जनजागृती हाेत आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी नवीन मार्ग निवडला आहे. फेसबुकवर तरुण, मध्यमवर्गीय लाेकांना सुंदर मुलीचा फाेटाे असलेल्या प्राेफाईलवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात येते. ही रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर मुलीच्या नावाने संदेशाचे आदान प्रदान सुरू हाेते. यादरम्यान, व्हाॅट्सॲप क्रमांक मिळवून त्यावरही व्हिडिओ काॅल सुरू हाेतात. व्हिडिओ काॅलदरम्यान शुटिंग करून त्याची रेकाॅर्डिंग संबंधित व्यक्तीला पाठवून पैशांची मागणी करण्यात येते. वेगवेगळ्या क्रमांकांवरून फाेन करून संबंधित व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यात येते. अनेक जण बदनामीच्या भीतीने मागेल तेवढे पैसे संबंधितांच्या खात्यात टाकतात. शिवाय कुणाला काहीही सांगत नसल्याने सायबर गुन्हेगारांचे फावते. त्यामुळे जनजागृती करण्यात येत आहे. फेसबुकवर अनाेळखी फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास ती स्वीकारू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

अशी करतात फसवणूक

फेसबुकवरून संदेशाचे आदान-प्रदान केल्यानंतर तुम्हाला व्हाॅट्सॲप क्रमांक विचारतात. व्हाॅट्सॲपवर व्हिडिओ काॅल सुरू हाेतात. या काॅलदरम्यान उत्तेजित करून आपले नग्न फाेटाे, व्हिडिओ रेकाॅर्डिंग करण्यात येते. त्यानंतर ती रेकाॅर्डिंग संबंधिताला पाठवून व्हायरल करण्याची भीती दाखवण्यात येते. व्हिडिओ नातेवाईकांपर्यंत पाठविण्याची भीती दाखवण्यात येते. त्यामुळे त्यांच्या जाळ्यात अनेक जण फसतात़ तसेच त्यांनी मागितलेले पैसे अनेक जण देऊन टाकतात.

 तक्रार दाखलच करीत नाहीत!

अनेक जण व्हिडिओमध्ये असल्यामुळे फसवणूक झाली तरी पाेलीस स्टेशन किंवा सायबर सेलकडे तक्रार देत नाहीत. अनेक जण ही बाब कुणालाही सांगत नाहीत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांचे फावते. जिल्ह्यात असे अनेक प्रकार घडले असले, तरी तक्रार मात्र एकही दाखल झालेली नाही.

 अशी घ्यावी खबरदारी!

अनाेळखी मुलीची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास स्वीकारू नये. चुकून फ्रेंड रिक्वेट स्वीकारली तरी त्या मुलीला प्रतिसाद देऊ नये. फसवणूक झाल्यास तातडीने जवळचे पाेलीस स्टेशन किंवा सायबर सेलकडे तक्रार करावी.

 

फेसबुकवर अनाेळखी मुली फ्रेंड रिक्वेट पाठवतात. त्यानंतर व्हाॅट्सॲपवर व्हिडिओ काॅल करून उत्तेजित करतात. नग्न व्हिडिओ काॅलचे रेकाॅर्डिग करून ब्लॅकमेल करतात. त्यामुळे अशा फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये़त. फसवणूक झाल्यास तातडीने तक्रार दाखल करावी़. सायबर सेलकडून याविषयी जनजागृतीही करण्यात येत आहे़.

विलास पाटील

दहशतवाद विरोधी कक्ष

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAkolaअकोलाFacebookफेसबुक