शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्माला सुपारी; सचिन वाजेने दिली भलीमोठी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 7:15 PM

Antilia Case : प्रदीप शर्माने त्याचा साथीदार संतोषसह मनसुखची हत्या घडवून आणली होती. नंतर त्याचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला.

ठळक मुद्दे या हायप्रोफाईल प्रकरणाच्या आरोपपत्रानुसार ३ मार्च रोजी सचिन वाजे यांनी माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत मिटिंग केली. याच मिटिंगमध्ये वाजे याने पैशांनी भरलेली बॅग प्रदीप शर्माला दिली.

अँटिलिया प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यानंतर दररोज नवनवीन महत्त्वाचे खुलासे होत आहेत. आरोपपत्रानुसार, मुख्य आरोपी सचिन वाजे याने मनसुख हिरेनला मारण्यासाठी मुंबई पोलिस दलातील माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना मोठी रक्कम दिली होती. त्यानंतर प्रदीप शर्माने त्याचा साथीदार संतोषसह मनसुखची हत्या घडवून आणली होती. नंतर त्याचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला.या हायप्रोफाईल प्रकरणाच्या आरोपपत्रानुसार ३ मार्च रोजी सचिन वाजे यांनी माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत मिटिंग केली. याच मिटिंगमध्ये वाजे याने पैशांनी भरलेली बॅग प्रदीप शर्माला दिली. ज्यामध्ये नोटांचे गठ्ठे भरले होते. पैसे मिळाल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी संतोष शेलार याच्याशी संपर्क साधला होता आणि एका वाहनाबद्दल बोलले होते, ज्याचा वापर मनसुख हिरेनच्या हत्येसाठी आणि त्याच वाहनातून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी केला जाणार होता.

मनसुख हिरेनच्या हत्येचा कट शिजल्यानंतर बडतर्फ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी मनसुख हिरेनचे अपहरण केले होते आणि नंतर त्याला संतोष शेलारच्या स्वाधीन केले होते. संतोष त्याचे साथीदार सतीश मोथुकरी, आनंद जाधव आणि मनीष सोनी यांच्यासह वाहनात उपस्थित होते. त्याचवेळी मनसुख हिरेनचा गळा दाबून खून करण्यात आला. त्यानंतर चार आरोपींनी मनसुख हिरेनचा मृतदेह मुंब्रा खाडीत फेकून देत विल्हेवाट लागली.सचिन वाजेचा कट होता की, अँटिलियाजवळ जिलेटिनने भरलेली कार पार्क करण्याची जबाबदारी मनसुख हिरेन घेणार होता. पण ते घडले नाही. मनसुख हिरेन यांनी हा आरोप आपल्या अंगावर घेण्यास नकार दिला. मग सचिन वाजेने त्याला या प्रकरणातून हटवण्यासाठी नवा कट आखला आणि या कटाची जबाबदारी माजी चकमकफेम प्रदीप शर्मा याच्याकडे सोपवली.पोलिसांनी 5 मार्च रोजी मुंब्रा खाडीतून मनसुख हिरेनचा मृतदेह बाहेर काढला. पूर्वी हे प्रकरण आत्महत्या असल्याचे सांगितले जात होते. पण नंतर हे प्रकरण उघड झाले. एनआयएने या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी रियाझुद्दीन काझी, निरीक्षक सुनील माने, दोषी कॉन्स्टेबल विनायक शिंदे, आनंद जाधव, सतीश मोथकुरी, क्रिकेट बुकी नरेश गौर, संतोष शेलार आणि मनीष सोनी यांच्यासह सचिन वाजे आणि प्रदीप शर्मा यांच्यावरही आरोप केले आहेत.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेPradeep Sharmaप्रदीप शर्माDeathमृत्यूMumbaiमुंबईmumbraमुंब्रा