गॅस कटरने ATM मधून पैसे लंपास करणार होते चोर, पण एका चुकीने १९ लाख रूपये जळून झाले राख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 01:00 PM2022-05-26T13:00:14+5:302022-05-26T13:00:30+5:30

Bengaluru Crime News : पोलीस म्हणाले की, अज्ञात चोरांनी एटीएम मशीन गॅस कटरच्या मदतीने उघडण्याचा प्रयत्न केला होता. याच प्रयत्नात तिथे आग लागली आणि एटीएममधील १९ लाख रूपये जळून राख झाले.

Bengaluru thieves try to cut canara bank atm with a gas cutter but 19 lakh rupees burnt to ashes | गॅस कटरने ATM मधून पैसे लंपास करणार होते चोर, पण एका चुकीने १९ लाख रूपये जळून झाले राख

गॅस कटरने ATM मधून पैसे लंपास करणार होते चोर, पण एका चुकीने १९ लाख रूपये जळून झाले राख

googlenewsNext

Bengaluru Crime News : चोरीची पूर्ण तयारी करून एटीएम मशीनमधील पैसे लंपास करण्यासाठी पोहोचले होते. पण त्यांच्या एका चुकीमुळे १९ लाख रूपये जळून राख झाले. पोलिसांनुसार, १४ ते १६ मे दरम्यान बंगळुरू शहरातील परप्पना अग्रहाराजवळ होसा रोडवरील कॅनरा बॅंकेच्या एटीएमवर चोरांनी पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला. पोलीस म्हणाले की, अज्ञात चोरांनी एटीएम मशीन गॅस कटरच्या मदतीने उघडण्याचा प्रयत्न केला होता. याच प्रयत्नात तिथे आग लागली आणि एटीएममधील १९ लाख रूपये जळून राख झाले.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वेबसाइटनुसार, पोलिसांनी सांगितलं की, एटीएमची देखभाल करणाऱ्या कंपनीने घटनेच्या एक आठवड्यानंतर तक्रार दाखल केली. पोलिसांनुसार, एटीएमच्या आत १०० रूपयांच्या २,९६५ नोटा, २०० रूपयांच्या १,९११ नोटा आणि ५०० रूपयांच्या २,५७३ नोटा होत्या. अशाप्रकारे एकूण १९.६५ लाख रूपयांच्या नोटा जळून राख झाल्या. 

एटीएमची देखभाल करणाऱ्या एफएसएस कंपनीचे राजा जी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राजाने पोलिसांना सांगितलं की, त्यांना कंपनीच्या कायदेशीर टीमसोबत याबाबत चर्चा करायची होती आणि त्यामुळेच तक्रार देण्यास उशीर झाला. तेच पोलीस म्हणाले की, तक्रारदाराने घटनेची माहिती मिळताच लगेच तक्रार द्यायला हवी होती. त्यांनी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजही दिलेलं नाही.

एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांनी राजाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घटनेचं स्पष्टीकरण मागितलं. सोबतच पोलिसांनी असंही सांगितलं की, लवकरच कंपनीलाही नोटीस जारी करून स्पष्टीकरण आणि घटनेबाबत अधिक माहिती मागितली जाईल.

Web Title: Bengaluru thieves try to cut canara bank atm with a gas cutter but 19 lakh rupees burnt to ashes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.