शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

ISISचा म्होरक्या अल बगदादीला शाेधणाऱ्या प्रजातीचा श्वान नाशिक पोलिसांकडे

By अझहर शेख | Updated: August 5, 2022 00:55 IST

बॉम्बशोधक पथकाची ‘बेल्जियन मेलिनोइस’मुळे वाढली ताकद! स्फोटकांसह अमली पदार्थांचा ‘अल्फा’ घेणार शोध

अझहर शेख, नाशिक: दडवून ठेवलेली स्फोटके असो किंवा मग अमली पदार्थांचा साठा शोधण्यात तरबेज ‘बेल्जियन मेलिनोइस’ प्रजातीचे श्वान शहर पोलिसांच्या बॉम्ब शोधक-नाशक पथकाच्या ताफ्यात बुधवारी (दि.३) दाखल झाले. अमेरिकी सैन्याने याच प्रजातीच्या श्वानांच्या मदतीने आयईएसआयचा म्होरक्या अबुबकर अल बगदादीला शोधून ठार मारले होते. यानंतर व्हाइट हाऊसच्या सुरक्षेसाठीसुद्धा या प्रजातीच्या श्वानांना तैनात करण्यात आले आहे. या श्वानाच्या आगमनाने शहर बीडीडीएसची ताकद वाढली आहे.

नाशिक शहर पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक-नाशक पथकाकडे लॅब्रोडोर जातीचे ‘लकी’ हे श्वान आहे. मागील वर्षी २५ फेब्रुवारी रोजी त्याचा साथीदार ‘स्निफर स्पाइक’ हा पोलीस दलातून दहा वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावून निवृत्त झाला होता. त्यानंतर लकी हा एकाकी पडला होता. बीडीडीएसला आणखी एका श्वानाची गरज प्रकर्षाने जाणवत होती. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त पौर्णिमा चौगुले, संजय बारकुंड यांनी श्वान खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले. आयुक्तालयाकडून ‘फँटम कॅनाइन्स’शी संपर्क साधण्यात आला. त्यांनी त्यास सकारात्मकता दर्शविली. राज्यातील विविध शहरांच्या पोलीस दलांना तरबेज श्वान पुरविण्याचा अनुभव असलेल्या या कॅनाइन्सकडून नाशिक शहर पोलीस दलाला थेट बेल्जियन मेलिनोईस प्रजातीच्या श्वानाचे दोन महिन्यांचे पिलू उपलब्ध करून दिले. बुधवारी या नव्या सदस्याच्या आगमनाने ‘लकी’ तर आनंदी झालाच मात्र बीडीडीएसचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही आनंद द्विगुणित झाला.

नवा सदस्य ‘अल्फा’ नामकरण

डॉबरमॅन, जर्मन शेफर्ड, लॅब्रोडोरसारख्या प्रजातीच्या श्वानापेक्षा कितीतरी पटीने जास्त वेगवान व दडविलेली स्फोटके, बॉम्बसदृश वस्तूंचा शोध घेण्यात सक्षम असलेले ताकदवान श्वान म्हणून ओळखले जाणारे बेल्जियन मेलिनोईस श्वानाचे पोलिसांनी ‘अल्फा’ असे नाव ठेवले आहे.

राज्यात या प्रजातीचे तरबेज श्वान गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा यासारख्या नक्षलवादी प्रभावित जिल्ह्यांच्या पोलीस दलाकडे आहेत. याशिवाय नागपूर, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, बीड, लातूूर जिल्ह्यांच्या पोलिसांच्या ताफ्यातही या श्वानांना अलीकडे स्थान देण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील पोलीस दलात नाशिकच्या रूपाने पहिल्यांदाच या आगळ्यावेगळ्या क्षमता ठेवणाऱ्या श्वानाने ‘एंट्री’ केली आहे.

...म्हणून या श्वानाची बीडीडीएसला गरज

नाशिक शहरात अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक धार्मिक स्थळे आहेत. त्याशिवाय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संरक्षण खात्याची विविध लष्करी केंद्रेही कार्यान्वित आहेत. राज्याच्या पोलिसांना धडे देणारी अकादमी, चलार्थपत्र मुद्रणालयासारखी (नोट प्रेस) संवेदनशील आस्थापना शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कार्यान्वित आहे. याशिवाय नाशिक रोडसारखे मोठे रेल्वेस्थानकही आहे, तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचेही दौरे यामुळे बीडीडीएसला अशा धाडसी व शक्तिशाली श्वानाची गरज होती.

"बेल्जियन हे श्वान अन्य प्रजातींच्या श्वानांच्या तुलनेत लवकर थकत नाही. या श्वानाची आयुमर्यादाही १२ ते १४ वर्षे असते. दोन महिन्यांचे हे श्वान बीडीडीएसकरिता घेण्यात आले आहे. लहानपणापासून श्वान घेतल्यामुळे त्याकरिता असलेल्या दोन्ही हस्तकांची आज्ञापालन तो अधिकाधिक चांगल्या पद्धतीने करील. हे श्वान अमली पदार्थ, स्फोटके शोधण्यापासून गुन्हेगारांचा माग काढण्यापर्यंत पटाईत आहे. शहर पोलीस दलात प्रथमच या श्वानाचे आगमन झाले आहे", असे पोलीस उपायुक्त (गुन्हे) संजय बारकुंड म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdogकुत्राNashikनाशिकPoliceपोलिस