शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
3
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
4
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
5
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
6
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
7
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
8
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
9
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
11
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
12
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
13
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
14
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
15
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
16
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
18
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
19
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
20
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 

वेटर, मॅनेजर बनून पोलिसांनी ठोकल्या सराईत सोनसाखळी चोराला बेडया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 10:11 PM

Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्षाबंधनाला घाटकोपरमध्ये ३ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपायुक्त  प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली  विशेष पथकाची नेमणूक करत पंतनगर पोलिसांनी तपास सुरु केला.

ठळक मुद्देया कारवाईत महंमद हुसेन हाजी हनिफा हाकम (३३) आणि हैदर अली शेर अली सारंग ( ३२ ) या दोघांना अटक करण्यात आले आहे.

मुंबई : हॉटेलमध्ये वेटर आणि मॅनेजर बनून सराईत सोनसाखळी चोराला पंतनगर पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. या कारवाईत महंमद हुसेन हाजी हनिफा हाकम (३३) आणि हैदर अली शेर अली सारंग ( ३२ ) या दोघांना गुरूवारी अटक करण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीतून ७ गुन्हे उघड़कीस आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्षाबंधनाला घाटकोपरमध्ये ३ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपायुक्त  प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली  विशेष पथकाची नेमणूक करत पंतनगर पोलिसांनी तपास सुरु केला. तांत्रिक तपासात गुह्यांत वापरलेली दुचाकी साकीनाका परिसरातील पे अँड पार्किंग याठिकाणी पार्क असल्याबाबतची माहिती  मिळाली. त्यानुसार पथकाने साध्या गणवेशात सापळा रचला. पुढे आणखीन एका दुचाकीबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. मोटरसायकल क्रमांक तसेच चलान वरून मोबाईल क्रमांक प्राप्त करून तांत्रिक तपास करून यातील एका आरोपीला पोलिसांनी पकड़ले. तसेच दुसरा आरोपी अंधेरीतील केएफसी चिकन सेंटर या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वेटर आणि मॅनेजर बनून आरोपीला अटक केली.

या कारवाईत महंमद हुसेन हाजी हनिफा हाकम (३३) आणि हैदर अली शेर अली सारंग ( ३२ ) या दोघांना अटक करण्यात आले आहे. हाकम हा पायधुनीचा तर सारंग हा चिंचबंदर परिसरातील रहिवासी आहे. त्यांच्या चौकशीतून  साकीनाका, घाटकोपर, व्ही. बी नगर, विलेपार्ले, कुर्ला, मानखुर्द, पंतनगर पोलीस ठाण्यातील ७ गुन्हे उघड़कीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोघांकडे अधिक तपास सुरु आहे.

टॅग्स :ArrestअटकMumbaiमुंबईPoliceपोलिसChain Snatchingसोनसाखळी चोरीGhatkoparघाटकोपरhotelहॉटेल