Beating by a municipal contractor for not paying the fine of without mask | विनामास्क असून दंड न भरल्याने महापालिका कंत्राटदाराकडून मारहाण

विनामास्क असून दंड न भरल्याने महापालिका कंत्राटदाराकडून मारहाणलोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मास्क न घालता रिक्षातून फिरणाऱ्या तरुणाला पालिकेच्या कंत्राटदाराने दंड भरण्यास सांगितले. मात्र त्याने नकार दिल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली, असा आरोप तरुणाने केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चारकोप पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत. 
कांदिवली परिसरात रिक्षात बसून एका महिलेशी सदर तरुण अश्लील भाषेत हुज्जत घालताना दिसत आहे. त्याच्या तोंडावर मास्क नसून त्याच्या म्हणण्यानुसार तो बोरिवलीच्या आयसी कॉलनीत राहतो. त्यानुसार त्याला मास्क न घातल्याप्रकरणी दंड आकरण्यात येत आहे. मात्र तो दंड भरण्यास तयार नव्हता. तो रिक्षातून खाली उतरतो आणि नंतर त्यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे. याप्रकरणी तो पोलिसांत तक्रार करण्याचे म्हणत आहे. आपल्याला पालिकेच्या कंत्राटदाराने मारहाण केल्याचा या तरुणाचा आराेप आहे. ही बाब अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत याना समजताच त्यांनी चारकोप पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. सदर तरुणाकडून अद्याप तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Beating by a municipal contractor for not paying the fine of without mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.