शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत बेदम मारहाण, दोघींचा विनयभंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 12:47 IST

Crime News : पीडित तरुणीने हिंमत दाखवत सोशल मीडीयावरून या घटनेला वाचा फोडली.

कल्याण - कल्याण नजीक असलेल्या मलंगगडच्या पायथ्याशी फिरायला जाणं तरुण तरुणींना चांगलच महागात पडलं आहे. तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत  6 ते 8 टवाळखोर मुलांनी सर्वांना बेदम मारहाण करत दोन तरुणींचा विनयभंग केला. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी स्वताची सुटका करून घेत नेवाळी पोलीस चौकी गाठली. 

मेडिकल करून या तसेच इथे तक्रार होणार नाही असे येथील पोलिसांनी त्यांना सांगितले. मात्र यातील पीडित तरुणीने हिंमत दाखवत सोशल मीडियावरून या घटनेला वाचा फोडली.  त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी संध्याकाळी उशिरा गुन्हा नोंद करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

तरुणींनी नेमका कोणता पेहराव करावा हे ठरविण्याचा अधिकार यांना दिला कोणी? असा सवाल उपस्थित करत अशा समाज कंटकावर कारवाई करत वेळीच याला आवर घातला जावा अन्यथा नागरिकांना पर्यटन स्थळी देखील स्वताच्या सुरक्षेसाठी शस्त्र घेऊनच जावे लागणार का? असा प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच सोशल मीडियावर एखाद्या गोष्टीला वाचा फोडल्यावरच पोलीस प्रशासन नेहमी का जागे होते? हा देखील एक विषय आहे.

विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन पथक आरोपींच्या शोधात रवाना करण्यात आले आहेत. तसेच  वर्णन केल्यानुसार आरोपींचे स्केच देखील बनवण्यात येत आहेत.

- विनायक नरळे, सहाय्यक पोलीस आयुक्त

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkalyanकल्याण