उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोर धिंगाणा, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 19:18 IST2020-05-03T19:17:51+5:302020-05-03T19:18:20+5:30

पोलीस स्टेशन बाहेर पोलिसा समक्ष निकम याने घरटे यांना पुन्हा मारहाण केली. याप्रकरणी समाधान निकम यांच्यासह चौघावर उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

beaten case in front of Ulhasnagar police station | उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोर धिंगाणा, गुन्हा दाखल

उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोर धिंगाणा, गुन्हा दाखल

 उल्हासनगर : जुन्या रागातून मारहाण व घरातील सामानाची तोडफोड केल्यानंतर पोलीस ठाण्यासमोर धिंगाणा घालणाऱ्या एका पक्ष पदाधिकाऱ्यासह चौघा विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-१ तेजुमल चक्की इंदिरा गांधी नगर झोपडपट्टीत परिसरात राहणारे रोहित घरटे भाऊ, मित्रा समवेत शनिवारी सायंकाळी पाच वाजता घरी बसले होते. यावेळी जुन्या रागातून एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी समाधान निकम याने मित्रांना घरटे याच्या घरी पाठविले. त्यांनी घरटे यांना मारहाण व घरातील सामानाची तोडफोड केली.

अशी तक्रार उल्हासनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर, पोलिसांनी समाधान निकम यांच्यासह सहकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलाविले. पोलीस स्टेशन बाहेर पोलिसा समक्ष निकम याने घरटे यांना पुन्हा मारहाण केली. याप्रकरणी समाधान निकम यांच्यासह चौघावर उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

Web Title: beaten case in front of Ulhasnagar police station