शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

हत्येपूर्वी नराधमाने चिमुकलीवर केला बलात्कार : वैद्यकीय अहवालातून पुष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 20:36 IST

कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंगा शिवारात झालेल्या पाच वर्षीय चिमुकलीच्या हत्याप्रकरणात आणखी एक प्रचंड संतापजनक पैलू उघड झाला आहे. तिची हत्या करण्यापूर्वी नराधम आरोपी संजय देवराव पुरी (३०, रा. लिंगा, ता. कळमेश्वर) याने तिच्यावर बलात्कार केला होता, हे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देबलात्काराचे कलम वाढले : पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखलनागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात प्रचंड तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंगा शिवारात झालेल्या पाच वर्षीय चिमुकलीच्या हत्याप्रकरणात आणखी एक प्रचंड संतापजनक पैलू उघड झाला आहे. तिची हत्या करण्यापूर्वी नराधम आरोपी संजय देवराव पुरी (३०, रा. लिंगा, ता. कळमेश्वर) याने तिच्यावर बलात्कार केला होता, हे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता हत्येसोबतच पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचेही कलम आरोपीविरुद्ध लावले असून, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याचेही (अ‍ॅट्रॉसिटी) कलम या प्रकरणात वाढवण्यात आले आहे.पीडित बालिका शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास आजीकडे जाते, असे सांगून घराबाहेर पडली होती. तिची आजी गावातीलच दुसऱ्या वस्तीत राहते. आजीच्या घराकडे जात असलेला रस्ता (पांदण) शेतातून जातो. दुसºया दिवशी सकाळी बालिकेची आजीच पीडित बालिकेच्या आईकडे आली. त्यावेळी बालिका बेपत्ता झाल्याचे सर्वांच्या लक्षात आले. त्यानंतर संपूर्ण गावच बालिकेचा शोध घेऊ लागले. ती कुठेच आढळली नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी शनिवारी दुपारी कळमेश्वर ठाण्यात तक्रार नोंदविली. तिचा शोध घेतला जात असतानाच रविवारी सकाळी बालिकेचा मृतदेह गावालगतच्या संजय भारती (रा. नागपूर) यांच्या शेतात आढळला. तिच्या मृतदेहाची अवस्था बघता, तिची हत्या करण्यात आल्याचे दिसून येत होते. त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. माहिती कळताच पोलिसांचा ताफा तेथे धडकला आणि पोलिसांनी तासाभरातच आरोपी संजय पुरीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान रविवारी सायंकाळी त्याने हत्या केल्याची कबुली दिली. तर, बालिकेचे शवविच्छेदन करणाºया डॉक्टरांनी हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा निष्कर्ष नोंदवला. यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.सोमवारी दुपारी यासंबंधाने पत्रकारांना माहिती देताना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांनी हत्येसोबतच पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचे कलम वाढवले असून, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याचेही (अ‍ॅट्रॉसिटी) कलम या गुन्ह्यात लावण्यात आल्याचे सांगितले आहे. प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता, त्यांनी यासंबंधाने विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले.जनभावना तीव्र, प्रचंड बंदोबस्तअवघ्या पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचे वृत्त आगीसारखे सर्वत्र पसरले असून, कळमेश्वर तालुक्यात या घटनेने प्रचंड तणाव निर्माण झाला. आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी लिंगा आणि कळमेश्वरात मोठ्या संख्येत धाव घेतली आहे. रविवारी रात्री लिंगा गावात कॅण्डल मार्च काढण्यात आला, तर कळमेश्वर ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. प्रकरण चिघळण्याचे संकेत मिळाल्यामुळे पोलिसांनी लिंगा तसेच कळमेश्वरमध्ये मोठा बंदोबस्त लावला आहे. आरोपीला पोलिसांनी अतिशय गोपनीय पद्धतीने कोर्टात हजर करून, त्याचा १३ डिसेंबरपर्यंत पीसीआर मिळवला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारMurderखूनnagpurनागपूर