एका व्यक्तीने पहिल्यांदा ५ महिलांशी डेटिंग App टिंडरवर चॅट केले. नंतर प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. या सर्व महिलांवर त्याने लैंगिक अत्याचार केले. हद्द इतकी पार केली की, त्याने त्याच्या तीन विद्यार्थींना आपले भक्ष्य बनवले. या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
'द सन'च्या वृत्तानुसार, ही व्यक्ती ब्रिटनची रहिवासी आहे. ज्याने रॉयल नेव्हीमध्ये नोकरी केली आहे. 31 वर्षीय टॉम रॉडवेल असे त्याचे नाव आहे. टॉमला बलात्काराच्या ११ घटनांमध्ये दोषी ठरविले. शारीरिक संबंध ठेवताना तो हिंसक व्हायचा. एका महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिने एक मेसेजही केला होता, ज्यामध्ये तिने लिहिले होते की, 'मी तुझ्यावर पुन्हा बलात्कार करायला कधी येऊ?