शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ; पोलिसांनी पाठलाग करुन सहाजणांना केले जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 18:47 IST

जिल्ह्यातील गुन्हेगारांवर हद्दपार, एमपीडीए, मोक्काच्या कारवाया करुन जिल्हा पोलीस दलाने वचक निर्माण केला. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी मध्यंतरी कमी झाली होती. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा दरोडेखोर, चोरांनी धुमाकूळ घातला आहे.

ठळक मुद्दे- अंबाजोगाई, नेकनूर पोलिसांनी आज पहाटे ही कारवाई केली - हे सर्व गुन्हेगार परभणी, नगर, औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. 

बीड : जिल्ह्यातील गुन्हेगारांवर हद्दपार, एमपीडीए, मोक्काच्या कारवाया करुन जिल्हा पोलीस दलाने वचक निर्माण केला. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी मध्यंतरी कमी झाली होती. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा दरोडेखोर, चोरांनी धुमाकूळ घातला आहे. आज पहाटे परळी व नेकनूरमध्ये सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. हे सर्व गुन्हेगार परभणी, नगर, औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याचे समोर आले असून बीड पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्रयत्न विफल ठरले. 

घटना क्रमांक १ : परभणीच्या गुन्हेगारांचा अंबाजोगाईत अयशस्वी प्लॅनपरभणी जिल्ह्यातील सहा दरोडेखोर रविवारी रात्री बसने परळीला आले. येथून रिक्षाने अंबाजोगाईला गेले. येथे एका ठिकाणी जीप चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु हॉर्न वाजल्याने परिसरातील नागरिक जागे झाले अन् त्यांचा प्रयत्न फसला. पुढे प्रशांतनगर भागात जाऊन त्यांनी कार (एमएच १३ एसी ५६१०) चोरली. या कारमधूनच दरोडा टाकण्यासाठी ते घर शोधत होते. एवढ्यात अंबाजोगाई शहर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे हे गस्त घालताना त्यांना आडवे गेले. पोलिसांना पाहून कार सुसाट धर्मापुरी मार्गे घाटनांदूरकडे गेली.

त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करुन यातील करनसिंग गगनसिंग टाक (रा. साकला, जि. परभणी) याला पकडले. इतर दरोडेखोर मात्र बाजूला असलेल्या जंगलाचा फायदा घेऊन पसार झाले. अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर ठाण्याचे सपोनि मारुती मुंडे व त्यांचे टीम, अंबाजोगाई ग्रामीण व शहर, परळी ग्रामीण व शहर या पोलिसांनी कारवाईसाठी परिश्रम घेतले.

घटना क्रमांक २ : जामखेडपासून पाठलाग करुन महाजनवाडीत पाच दरोडेखोर जेरबंदजामखेडमार्गे बीड जिल्ह्यात दरोडा टाकण्यासाठी नऊ जणांची टोळी येत असल्याची माहिती बीड पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे दरोडा प्रतिबंधक पथकाने नेकनूर पोलिसांच्या मदतीने जामखेडपासूनच पाठलाग केला. बीड तालुक्यातील महाजनवाडी परिसरात सापळा लावला. तीन दुचाकींवरुन नऊ जण येत असल्याचे दिसताच पोलिसांनी झडप घातली. यावेळी त्यांनी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडा प्रतिबंधक, नेकनूर पोलीस व आरसीपीच्या जवानांनी त्यांचा पाठलाग करुन नऊपैकी पाचजणांना अटक केली. यामध्ये योगेश विष्णू पवार (३०, अहमदनगर), शहादेव राजाभाऊ चादर (३०, क्रांतीनगर, पाटोदा), आकाश अशोक चव्हाण (२४, मुकींदपूर, अहमदनगर), राहुल शाम काळे (२५, हर्सूल तलावाजवळ, औरंगाबाद), भूपेंद्र महावीर सहानी (रा. मुज्जफरपूर, बिहार) यांचा आरोपीत समावेश आहे. पहाटे तीनच्या सुमारास हा थरार घडला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बो-हाडे, उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. भाऊसाहेब गोंदकर, सपोनि गजानन जाधव, पोउपनि वाटोरे, भारत माने, मुंजाबा सौंदरमल, राजाभाऊ नागरगोजे, श्रीमंत उबाळे, संजय खताळ, हरिभाऊ बांगर, अशोक दुबाले, भारत बंड, राहुल शिंदे, चालक साबळे, सोनवणे, डोंगरे, गौतम वाघमारे, महेश अधटराव, ढाकणे, काळे, बागवान, यादव यांनी केली.

टॅग्स :RobberyदरोडाBeed policeबीड पोलीसCrimeगुन्हाArrestअटक