शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नीरव मोदीसाठी आर्थर रोड तुरुंगातील बराक क्र. १२ सज्ज  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 9:06 PM

युकेमधून नीरव मोदीचे प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याची थेट या तुरुंगात रवानगी केली जाणार आहे.

ठळक मुद्देनीरव मोदीला युकेच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी लंडनमध्ये १९ मार्च रोजी अटक केली होती.बराक क्रमांक १२ हा रिकामा असून त्यात नीरव मोदी आणि विजय मल्ल्याला एकत्र ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. 

मुंबई - पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १३ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीसाठी मुंबईतील ऑर्थर रोड मुं कारागृहात एक उच्च सुरक्षा असलेला बराक क्र. १२ तयार ठेवण्यात आली आहे. युकेमधून नीरव मोदीचे प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याची थेट या तुरुंगात रवानगी केली जाणार आहे. राज्याच्या गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिल्याचे टाईम्स ऑफ इंडियाने वृत्तात म्हटले आहे.नीरव मोदीला मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार असेल तर सुरक्षेबाबत या कारागृहाची स्थिती काय आहे आणि त्या ठिकाणी कोणत्या सोयी - सुविधा पुरवण्यात येतात याची माहिती कारागृह विभागाने गेल्या आठवड्यात गृहमंत्रालयाला दिली होती. याच माहितीबाबत नुकतीच केंद्र सरकारनेही राज्य सरकारकडे याबाबत विचारणा केली होती. नीरव मोदीला युकेच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी लंडनमध्ये १९ मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकताच युकेच्या वेस्टमिनस्टर कोर्टाने गेल्या महिन्यात त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. आर्थर रॉड कारागृहातील एका अशा बराकमध्ये तीन आरोपींना ठेवण्यात आलं आहे. तर बराक क्रमांक १२ हा रिकामा असून त्यात नीरव मोदी आणि विजय मल्ल्याला एकत्र ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. बराक क्रमांक १२ कसा आहे ?२० फूट बाय १५ फूट आकाराची ही खोली असून यामध्ये ३ पंखे, ६ ट्युबलाईट्स आणि २ खिडक्या आहेत. युरोपिअन नियमांनुसार, नीरव मोदीला या खोलीत वैयक्तिक ३ चौरस मीटरचा भाग वापरता येईल. तसेच त्याला एक कापसाची गादी, उशी, बेडशीट आणि ब्लॅंकेट पुरवण्यात येईल. तसेच त्याला केवळ व्यायामासाठी आणि दिवसभरात एक तासापर्यंत या खोलीबाहेर फिरता येईल. त्याचबरोबर खेळती हवा, पुरेसा प्रकाश आणि त्याच्या वस्तू ठेवण्यासाठी एक लॉकरही देण्यात येईल. त्याला दररोज स्वच्छ पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, टॉयलेट आणि बाथरुम सुविधा देण्यात येतील, असेही संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीArthur Road Jailआर्थररोड कारागृहPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा