नीरव मोदीसाठी आर्थर रोड तुरुंगातील बराक क्र. १२ सज्ज  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 21:07 IST2019-06-11T21:06:29+5:302019-06-11T21:07:57+5:30

युकेमधून नीरव मोदीचे प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याची थेट या तुरुंगात रवानगी केली जाणार आहे.

Barrack no. 12 in arther road jail is ready for nirav modi | नीरव मोदीसाठी आर्थर रोड तुरुंगातील बराक क्र. १२ सज्ज  

नीरव मोदीसाठी आर्थर रोड तुरुंगातील बराक क्र. १२ सज्ज  

ठळक मुद्देनीरव मोदीला युकेच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी लंडनमध्ये १९ मार्च रोजी अटक केली होती.बराक क्रमांक १२ हा रिकामा असून त्यात नीरव मोदी आणि विजय मल्ल्याला एकत्र ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. 

मुंबई - पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १३ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीसाठी मुंबईतील ऑर्थर रोड मुं कारागृहात एक उच्च सुरक्षा असलेला बराक क्र. १२ तयार ठेवण्यात आली आहे. युकेमधून नीरव मोदीचे प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याची थेट या तुरुंगात रवानगी केली जाणार आहे. राज्याच्या गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिल्याचे टाईम्स ऑफ इंडियाने वृत्तात म्हटले आहे.

नीरव मोदीला मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार असेल तर सुरक्षेबाबत या कारागृहाची स्थिती काय आहे आणि त्या ठिकाणी कोणत्या सोयी - सुविधा पुरवण्यात येतात याची माहिती कारागृह विभागाने गेल्या आठवड्यात गृहमंत्रालयाला दिली होती. याच माहितीबाबत नुकतीच केंद्र सरकारनेही राज्य सरकारकडे याबाबत विचारणा केली होती. नीरव मोदीला युकेच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी लंडनमध्ये १९ मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकताच युकेच्या वेस्टमिनस्टर कोर्टाने गेल्या महिन्यात त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. आर्थर रॉड कारागृहातील एका अशा बराकमध्ये तीन आरोपींना ठेवण्यात आलं आहे. तर बराक क्रमांक १२ हा रिकामा असून त्यात नीरव मोदी आणि विजय मल्ल्याला एकत्र ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. 

बराक क्रमांक १२ कसा आहे ?
२० फूट बाय १५ फूट आकाराची ही खोली असून यामध्ये ३ पंखे, ६ ट्युबलाईट्स आणि २ खिडक्या आहेत. युरोपिअन नियमांनुसार, नीरव मोदीला या खोलीत वैयक्तिक ३ चौरस मीटरचा भाग वापरता येईल. तसेच त्याला एक कापसाची गादी, उशी, बेडशीट आणि ब्लॅंकेट पुरवण्यात येईल. तसेच त्याला केवळ व्यायामासाठी आणि दिवसभरात एक तासापर्यंत या खोलीबाहेर फिरता येईल. त्याचबरोबर खेळती हवा, पुरेसा प्रकाश आणि त्याच्या वस्तू ठेवण्यासाठी एक लॉकरही देण्यात येईल. त्याला दररोज स्वच्छ पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, टॉयलेट आणि बाथरुम सुविधा देण्यात येतील, असेही संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. 

Web Title: Barrack no. 12 in arther road jail is ready for nirav modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.