शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरता! युवकाला झाडाला बांधून अमानुष मारहाण करत मूत्र पाजले; संतापजनक व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 10:39 IST

चौहटाना पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल गोपाळ यांनी सांगितले की, मंगळवारी दुपारी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात काही लोक युवकाला झाडाला बांधून जबरदस्तीनं त्याचे मुंडन करण्याचा प्रयत्न आणि मारहाण केली.

ठळक मुद्देराजस्थानच्या बाडमेरमधील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल युवकाला जबरदस्तीनं झाडाला बांधून केस कापले आणि मूत्र पाजलेव्हायरल व्हिडीओने पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला

बाडमेर – राजस्थानच्या चौहटाना परिसरात एका युवकाला काही लोकांनी घराच्या बाहेरील झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. व्हिडीओची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस अधीक्षकांनी चौहटाना पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

चौहटाना पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल गोपाळ यांनी सांगितले की, मंगळवारी दुपारी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात काही लोक युवकाला झाडाला बांधून जबरदस्तीनं त्याचे मुंडन करण्याचा प्रयत्न आणि मारहाण केली. या व्हिडीओची पडताळणी केली असता युवक बाखासर परिसरातील असल्याचं आढळलं. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना माहिती मिळाली की, हा युवक २५ जुलैच्या रात्री कोनरा गावात आला होता. त्याठिकाणी त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

काय आहे या व्हिडीओ?

व्हायरल व्हिडीओत एका युवकाचे हातपाय झाडाला बांधून जबरदस्तीनं त्याचे मुंडन करण्यात आले. त्यानंतर युवकाला दारुच्या बाटलीतून मूत्र पाजले, ही घटना तीन-चार दिवसापूर्वीची आहे. युवकासोबत झालेला अमानुष अत्याचार कोणीतरी व्हिडीओत कैद केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहचले. पण पीडिताच्या बाजूने साक्ष देण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही. सदरील प्रकरण ग्रामस्थांनी दोन्ही बाजूंशी चर्चा करुन सोडवलं होतं, दोन्ही बाजूने तडजोड झाल्यामुळे कोणीही या घटनेची वाच्यता केली नाही. त्यानंतर पोलिसांनी पीडिताशी संपर्क साधून गुन्हा दाखल करण्यास सांगितले पण त्यानेही नकार दिला. त्यामुळे व्हायरल व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल करुन घेतला आहे. याबाबत पीडिताची आरोग्य तपासणी करण्यात येईल, ही घटना का घडली याचा शोध घेतला जाईल, त्यानंतर दोषींवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल असा विश्वास बाडमेरचे पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी व्यक्त केला आहे. तसेच लवकरच आरोपींना ताब्यात घेऊ असंही ते म्हणाले.

टॅग्स :PoliceपोलिसRajasthanराजस्थान