शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

भाईंदरच्या आॅर्केस्ट्रा बारमधून बारबाला, ग्राहकांसह ४५ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 21:23 IST

गुप्त खोलीत लपवलेल्या ६ बारबालांची सुटका

मीरारोड - भार्इंदर पूर्वेच्या प्राईम या आॅर्केस्ट्रा बारच्या आड चालणाऱ्या अश्लील नृत्य व  बीभत्स प्रकाराची माहिती मिळताच पोलीसांनी टाकलेल्या धाडीत १० बारबालांसह ग्राहक, बार कर्मचारी, चालक - मालक अशा एकूण ४५ जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलाय. या बारमध्ये ६ बारबालांना कोंदट अशा गुप्त खोलीत लपवुन ठेवले होते. परिणामी त्यांच्या जीवितास धोका निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

पूर्वेला फाटकाजवळील औद्योगिक वसाहतीमध्ये प्राईम नावाचा आॅर्केस्ट्रा बार आहे. या बारमध्ये अश्लिल व बीभत्स प्रकार चालत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजीराव राठोड, अपर अधिक्षक संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारच्या मध्यरात्रीनंतर नवघरचे पोलीस निरीक्षक राम भालसिंग, उपनिरीक्षक विजय टक्के व राठोड तसेच पोलीस पथकाने धाड टाकली. या धाडीत बारमध्ये चार बारबाला तोकड्या कपड्यात अश्लिल हावभाव करुन नाचत होत्या. तर पुरुष ग्राहक त्यांच्यावर नोटांची उधळण करत होते. पोलिसांनी या बारबालांसह बारचे कर्मचारी अशा १८ जणांना तर १६ ग्राहकांना अटक केली. बारमध्ये आणखी बारबाला असल्याची माहिती असल्याने त्यांचा शोध घेतला असता अत्यंत कोंदट व गुप्त खोलीत ६ बारबालांना लपवून ठेवल्याचे आढळून आले. बारचे चालक - मालक ललित राज पुरोहित, जगदिश शेट्टी, सुनील शेट्टी, महेश शेट्टी, जया ठाकुर यांच्यावर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीraidधाड