शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खोटी सही करून फसविणाऱ्याला बारामती पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 20:49 IST

प्रशासनावर वचक असणाऱ्या अजितपवारांसोबतच असा प्रकार घडल्याने खळबळ

ठळक मुद्देतोतयागिरी करून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खोटी सही करून खाजगी सचिव असल्याचे भासवून तोतयागिरी करून फसवणुक केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनावर वचक असणाऱ्या ‘अजितदादां’ बाबतच असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रक़रणी अजय कामदार (वय ६४, रा.मुंबई ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हयातील आरोपी तुषार तावरे (रा.तारांगण सोसायटी, बारामती, जि.पुणे) यास अटक करण्यात आली  आहे. तावरे याने बुधवारी (दि १४ ऑक्टोबर) कामदार यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला. '' मी उपमुख्यमंत्री कार्यालयातुन बोलतोय ,अजितदादा पवार यांच्याकडे आपल्याविरुध्द तक्रार आल्याचे सांगितले. तक्रार तुम्हास व्हॉट्सअपला पाठविली आहे. ती बघण्यास सांगितले. त्यावर कामदार यांनी संबंधित व्हॉट्सअपवर मेसेज व तक्रार अर्ज पाहिले . त्यावर त्यांचे बांधकाम व्यवसायासंदर्भात तक्रारी अर्जावर उपमुख्यमंत्र्यांचा तात्काळ कारवाई करावी, असा शेरा होता...''

त्यामुळे कामदार यांनी घाबरून आरोपी तावरे यांना संपर्क साधला. तावरे यांनी त्यांना तुमच्याविरुध्द दिलेला अर्ज मी कमिशनरकडे न पाठवता माझ्याकडे ठेवला आहे. तुमचे व अर्जदाराचे वाद तीन दिवसात मिटवुन घ्य ,नाहीतर आपले विरूध्द कडक कारवाई होईल असे सांगितले.तसेच संबंधित निवेदनावर अजितदादा यांची सही आहे, असे सांगुन प्रकरण मिटवुन घेण्यास सांगितले.

मात्र, कामदार यांना शंका आल्याने उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयास संपर्क साधला. मात्र, तुषार तावरे नावाचा कोणीही व्यक्ती कार्यालयात काम करत नाही. अजितदादा उदया बारामतीत आहेत. त्यांना जावुन सर्व प्रकार सांगा असे त्यांना सांगण्यात आले. त्यावर कामदार हे बारामतीमध्ये आले व त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सुनिल मुसळे यांना हा सर्व प्रकार सांगितला. मुसळे यांनी कायदेशीर कारवाई करण्याची सुचना केली. त्यानंतर कामदार यांनी फिर्याद दिली. त्यानुसार तोतयागिरी करून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयात इतरांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय आहे. याबाबतचा शोध पोलीस घेत आहेत.

अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले करीत आहेत. दरम्यान, अशा कोणत्याही व्यक्तीने तोतयागिरी वरून उपमुख्यमंत्र्यांच्या  स्वीय सहाय्यक ,खाजगी सचिव अगर कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगत फसवणुक केली असल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक