शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बारामती-फलटण रस्त्यावर खुलेआम सुरू आहे मटका , शालेय विद्यार्थ्यांवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 00:33 IST

सांगवी, माळेगाव परिसरात पोलिसांच्या गाफील कारभारामुळे अवैध धंदेवाल्यांनी आता चांगलेच तोंड वर काढलेले दिसत आहे. त्यांच्यावर तालुका पोलिसांचे कोणत्याही प्रकारे दडपण नसल्याने मोठ्या प्रमाणात खुलेआम अवैध धंदे वाढू लागले आहेत.

सांगवी -  सांगवी, माळेगाव परिसरात पोलिसांच्या गाफील कारभारामुळे अवैध धंदेवाल्यांनी आता चांगलेच तोंड वर काढलेले दिसत आहे. त्यांच्यावर तालुका पोलिसांचे कोणत्याही प्रकारे दडपण नसल्याने मोठ्या प्रमाणात खुलेआम अवैध धंदे वाढू लागले आहेत. याचा परिणाम आता थेट शालेय विद्यार्थ्यांवर देखील होऊ लागला आहे. त्यामुळे पालकांची मुलांविषयी चिंता वाढली आहे.सांगवी येथे भर चौकात बारामती-फलटण राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला खुलेआम खुर्च्या टेबल मांडून अद्यापही मोठ्या प्रमाणात मटक्याचे बुके घेतले जात आहेत. ही सर्व बाब पोलीस प्रशासनाला दिसत नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. अवैध व्यावसायिकांवर बारामतीचे पोलीस प्रशासन गाफील झाले असल्याचे समोर येऊ लागले आहे. यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.बारामतीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी कारवाईचा बडगा उचलण्यासाठी जाणूनबुजून टाळाटाळ करीत आहेत. अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याची धमक आता पोलीस प्रशासनात राहिली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रस्त्याच्या कडेला टेबल खुर्च्या मांडून मटका व्यवसाय थाटात सुरू असल्याने, सांगवी येथील विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी परिसरातील ३-४ गावांमधून ही मुली याच रस्त्याने चालत ये-जा करत असतात. हेच धंदे या शालेय मुलांचे येता जाता लक्ष वेधून घेत आहेत.यामुळे त्यांच्यावर याचा परिणाम होत आहे. काही मुलांच्यात या धंद्याबाबत उत्सुकता वाढत आहे. त्यामुळे पैशाच्या हव्यासापोटी काही लहान मुले ही आता लपूनछपून मटक्याच्या अड्ड्यावर येऊन मटका खेळून पैसा उडवू लागले आहेत. पण देशाचे भविष्य या शालेय विद्यार्थ्यांवर असते.विद्यार्थीदशेत असताना त्यांना वाईट मार्गाने कमी वेळात जास्त पैसा मिळण्याचे साधन उपलब्ध होऊ लागल्याने हीच मुले भविष्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दिशेने जाणारा मार्ग शोधू लागतात. याच मुलांचे भविष्य धोक्यात येतेय की काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सांगवी, माळेगाव परिसरासह इतर गावांतही जुगार, दारू, मटका, व्यवसाय जोरदार सुरू आहेत. यातच हे अधिकारी समाधान व्यक्त करत आहेत.पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षबारामती मद्ये खुलेआमपणे मटका सुरु आहे. अनेक पानाच्या टपऱ्यांवर पानपट्टीचे कोणत्याची वस्तू विक्रीस नाही तरी देखील त्या टपरीत एक कागद वही घेऊन बसलेली व्यक्ती दिसते. या दृष्यावरूनच तेथे मटका सुरु असल्याचे सहज लक्षात येते त्यासाठी कोणाच्या तक्रारीची गरज नाही. तरी हे पोलिसांना दिसत नसल्याने पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.सांगवी, माळेगाव परिसरात खुलेआम अवैध धंदे सुरू असतील तर त्यावर कारवाई केली जाईल.- नारायण शिरगांवकर,उपविभागीय पोलीस अधिकारी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे