शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या उपाध्यक्षाचीच ६६ लाखांची फसवणूक; शेअरमध्ये २०० टक्के नफ्याचे प्रलोभन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 10:49 IST

सायबर लुटारूंनी बँकेच्या उपाध्यक्षाची ६६ लाख ७१ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याबाबत मीरा रोडच्या काशीगाव पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

मीरा रोड : सायबर लुटारूंनी बँकेच्या उपाध्यक्षाची ६६ लाख ७१ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याबाबत मीरा रोडच्या काशीगाव पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास प्रतिमहिना २०० टक्के फायदा होण्याचे प्रलोभन दाखवून त्यांची फसवणूक केली आहे. 

मीरा रोडच्या विनयनगर जेपी नॉर्थ गार्डनमध्ये राहणारे समीर इसाक खलिफे (५१) हे एका बँकेच्या मुंबई कॉर्पोरेट कार्यालयात उपाध्यक्ष पदावर नोकरी करीत आहेत. मार्चमध्ये त्यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर संदेश आला, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास प्रतिमहिना २०० टक्के फायदा होईल. त्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करण्यास सांगण्यात आले. खलिफे यांनी व्हाॅट्सॲप ग्रुप जॉइन करून १० दिवस निरीक्षण केले असता ग्रुपमधील सदस्य त्यांना झालेला नफा त्यात दाखविण्यात आला हाेता. 

दोन कोटी ७७ लाख नफा दिसला; पण...आरोपींवर विश्वास बसल्याने थोडेथोडे करून समीर खलिफे यांनी ६६ लाख ७१ हजार २१७ रुपये त्यांनी विविध खात्यातून गुंतवले. काही दिवसांनी नफा म्हणून दोन कोटी ७७ लाख ५६ हजार रुपये दिसून येत होते. मात्र, रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता ती निघत नव्हती. त्यांनी संबंधितांशी संपर्क केला असता त्यांना आणखीन रक्कम गुंतवण्यास सांगितले. 

अनेकांवर गुन्हा दाखलआणखी पैसे नसल्याने, तसेच समोरच्या आरोपींनी पूर्ण प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर समीर यांनी काशीगाव  पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. १ ऑक्टोबरला पोलिसांनी  संजना, अजय केडिया, आकाश बंसल, अशी नावे सांगणाऱ्या मोबाइल क्रमांकधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रुप ॲडमिन संजना, अजय केडिया यांच्याशी चॅटिंग व बोलणे केले असता जॉइन होण्यासाठी गुगल फॉर्म पाठवला. तो फॉर्म भरल्यावर त्यांनी सांगितल्यानुसार वेबसाइट लॉगिन केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bank VP Duped of ₹66 Lakhs in Share Market Scam

Web Summary : A bank vice president from Mira Road lost ₹66.71 lakhs to cyber fraudsters promising 200% monthly returns on share market investments. Police have registered a case against three individuals after the VP was unable to withdraw promised profits and further demands were made.