शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

सचिन वाझेला धक्का; घरातच नजरकैद ठेवण्याची मागणी कोर्टानं फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 22:13 IST

Sachin Vaze : वाझेला घरचं जेवण देण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. 

ठळक मुद्देबायपास सर्जरीनंतर काहीकाळ घरातच नजरकैदेत ठेवण्याची वाझेची मागणी कोर्टाने फेटाळली आहे.

सचिन वाझेला आणखीन दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार आहे. बायपास सर्जरीनंतर काहीकाळ घरातच नजरकैदेत ठेवण्याची वाझेची मागणी कोर्टाने फेटाळली आहे. वाझेला वोकहार्ट हॉस्पिटलमधून जेलमध्ये नेण्याची परवानगी देण्यात आली असून गरज पडल्यास जे जे रुग्णालयातील जेल वॉर्डात दाखल करण्यास मुभा कोर्टाकडून देण्यात आली आहे. मात्र वाझेला घरचं जेवण देण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. 

 

अँटिलिया स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेवर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर वाझेवर मुंबई सेंट्रलमधील वोकहार्ट रुग्णालयात सर्जरी करण्यात आली आहे. यावेळी रुग्णालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.          सचिन वाझे गेले काही दिवस भिवंडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. हृदय विकाराचा त्रास असल्याने शस्त्रक्रियेसाठी सोमवारी मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवाऱी ओपन हार्ट सर्जरी पार पडली. कार्डिअॅक सर्जन डॉ कमलेश जैन आणि कार्डिओलॉजिस्ट डॉ अंकुर आणि डॉ केदार यांच्या टीमने वाझेवर शस्त्रक्रिया केली. वाझेची प्रकृती स्थिर असल्याचे तेथील डॉक्टराकड़ून सांगण्यात आले होते.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेCourtन्यायालयJ. J. Hospitalजे. जे. रुग्णालयPoliceपोलिस