Bajrang Dal Worker killed: बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची भरदिवसा हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणासंदर्भातील एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही लोक धारदार शस्त्रांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर हल्ला करताना दिसत आहे. तर आजूबाजूचे लोक बघत आहेत. कर्नाटकातील मंगळुरूमध्ये ही घटना घडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सुहास शेट्टी असे हत्या करण्यात आलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर तो फैजल नावाच्या व्यक्तीच्या हत्येतील आरोपी होता, असे समोर आले.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर शहरात तणाव
सुहास शेट्टीच्या हत्येनंतर मंगळुरूमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांनी घटना घडलेल्या भागात आणि शहरातील इतर भागात बंदोबस्तात वाढ केली.
वाचा >>अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला अटक
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून अशी माहिती समोर आली की, सुहास शेट्टीवर फैजल नावाच्या व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप होता. भाजपचा कार्यकर्ता प्रवीण नेतारूच्या हत्येनंतर फैजलची हत्या करण्यात आली होती. प्रवीण नेतारूच्या हत्येचा तपास सध्या एनआयएकडे आहे.
बजरंग दलाचा कार्यकर्ता सुहासची हत्या झाल्याची बातमी शहरभर पसरल्याने तणाव वाढला. ज्या रुग्णालयामध्ये सुहासचा मृतदेह आणण्यात आला, तिथली सुरक्षाही वाढवण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजप खासदार नलिन कुमार कटील यांनी रुग्णालयात धाव घेतली.
६ मे पर्यंत शहरात जमावबंदी
सुहास शेट्टीच्या हत्येनंतर तणाव वाढला. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी जमाव बंदी आदेश लागू केले आहेत. ज्या व्यक्तींनी सुहासवर हल्ला केला होता, त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान, सुहास शेट्टीवर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ज्या ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, तिथेही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी आणि हिंसक घटना टाळण्यासाठी पाच जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य राखीव दलाच्या ५२ तुकड्या आणि १००० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी शहरात तैनात करण्यात आले आहेत.