शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

बैतुल येथील सामूहिक अत्याचारग्रस्त विद्यार्थिनीचा नागपुरात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 10:15 PM

बैतुल येथील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका आठव्या इयत्तामधील ग्रामीण विद्यार्थिनीने सामूहिक अत्याचारानंतर स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. नागपुरातील रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी तिचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देअत्याचारानंतर स्वत:ला घेतले पेटवून : तीन आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बैतुल येथील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका आठव्या इयत्तामधील ग्रामीण विद्यार्थिनीने सामूहिक अत्याचारानंतर स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. नागपुरातील रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी तिचा मृत्यू झाला.मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली होती. ९० टक्के जळाल्याने ती गंभीर होती. होती. बैतूल येथील जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला नागपुरातील रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. मात्र बुधवारी सकाळी ९ वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून सर्व तिन्ही आरोपींना अटक केली. ते सर्वजण कॅटरिंग आणि वाहन चालविण्याचे काम करतात. या तिघांनी महिनाभरापूर्वी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला होता. त्यानंतरही ते तिला सतत त्रास देत होते, अशी माहिती आहे.बैतूलचे पोलीस अधीक्षक धर्मेंद्रसिंह भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही आरोपींविरोधात पॉक्सो कायद्यासह कलम ३७६, (ड), ३७६ (२) लावण्यात आले आहेत. तिच्या मृत्यूनंतर ३०२ कलमही लावले आहे. पीडितेच्या मृत्यूपूर्व बयानाच्या आधारावर आरोपी संदीप बिसाने याला अमरावतीमधून, नीतेश नागले याला कालडोंगरी येथून तर तिसरा फरार आरोपी अजय चौरासे याला बुधवारी भोपाळमधून अटक करण्यात आली.पीडितेने जाळून घेतल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक धर्मेंद्र सिंह भदौरिया आणि सहायक पोलीस अधीक्षक श्रद्धा जोशी यांनी रात्रीच रुग्णालयात जाऊन पीडितेची भेट घेतली आणि जाबजबाब नोंदविले. आपल्या मृत्यूला संदीप हा जबाबदार असल्याचा उल्लेख असलेली एक चिठ्ठी तिच्याजवळ मिळाली होती. त्यात एक मोबाईल नंबरही लिहिलेला होता. मृत्यूपूर्व बयानामध्ये तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचे सांगितले होते. नागपुरात शवविच्छेदन झाल्यावर तिचे प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. प्रेत नेण्यासाठी पोलिसांनी वाहनाची व्यवस्था करून दिली. पीडितेचे कुटुंबीय अत्यंत गरीब असल्याने सर्वतोपरी सहकार्य केले जात असल्याचे बैतूल पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारStudentविद्यार्थीDeathमृत्यू