शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

अल्पवयीन मातेसह बाळाचा मृत्यू: आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 10:18 PM

: सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीला शस्त्राचा धाक दाखवीत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहिली. तिने रविवारी (दि. २३) बाळाला जन्म दिला असून, सोमवारी (दि. २४) तिचा व बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देजीवे मारण्याची धमकी देत केला वारंवार अत्याचारनागपूर जिल्ह्यातील खापरखेडा भागातील क्रौर्य

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर (खापरखेडा) : सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीला शस्त्राचा धाक दाखवीत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहिली. तिने रविवारी (दि. २३) बाळाला जन्म दिला असून, सोमवारी (दि. २४) तिचा व बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील आरोपीस पोलिसांनी अटक केली. ही घटना खापरखेडा येथील इंदिरानगरात घडली.रूपेश ऊर्फ फाटा संतोष उईके (२०, रा. इंदिरानगर, आबादी, खापरखेडा, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने याच वस्तीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमजाळ्यात अडकविले. जीवे मारण्याची धमकी देत व शस्त्राचा धाक दाखवीत त्याने तिच्याशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. हलाखीची परिस्थिती असल्याने तिच्या कुटुंबीयाला त्याचा प्रतिकार करणे शक्य झाले नाही.पोटात कळा उठायला सुरुवात झाल्याने तिला शुक्रवारी (दि. २१) नागपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती केले होते. तिने रविवारी बाळाला जन्म दिला असून, सोमवारी माता व बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तिच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केल्याने खापरखेडा पोलिसांनी भादंवि ३७६ (२) (एफ) (एन), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ अन्वये गुन्हा दाखल केला. शिवाय आरोपी रूपेश यास हिवराबाजार (ता. रामटेक) परिसरातील जंगलातून ताब्यात घेत अटक केली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारDeathमृत्यू