शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 10:42 IST

NCP Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे सातत्याने होत आहेत.

माजी राज्यमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे सातत्याने होत आहेत. पोलिसांच्या तपासात आणि चौकशीत अनेक गुपितं उघड होत आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग जवळपास निश्चित झाला असल्याचं म्हटलं जात आहे. आरोपींनी चौकशीदरम्यान गुन्हे शाखेला सांगितलं की, ते पंजाबमधीलतुरुंगात होते, तेव्हा त्यांची बिश्नोई गँगमधील सदस्याशी ओळख झाली.

अडीच लाख रुपयांची सुपारी 

या चार आरोपींपैकी तीन आरोपी हे पंजाबमधीलतुरुंगात होते. तिथे आधीपासून तुरुंगात असलेल्या बिश्नोई टोळीच्या सदस्याशी शूटर्सची ओळख झाली. त्यामुळे त्यानंतर तिन्ही आरोपी हे देखील लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये सामील झाले. यानंतर आरोपींनी बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी अडीच लाख रुपयांची सुपारी घेतली.

शूटर्सनी कुर्ला परिसरात भाड्याने घेतलं घर

हत्येनंतर शूटर प्रत्येकी ५०-५० हजार रुपये वाटून घेणार होते. मात्र मुंबई पोलिसांनी त्यांना त्याआधीच पकडलं. चौकशीदरम्यान शूटर्सनी असंही सांगितलं की, एक महिन्यापूर्वी (२ सप्टेंबर रोजी) शूटर्सनी मुंबईतील कुर्ला परिसरात भाड्याने घर घेतलं होते. त्यासाठी दरमहा १४ हजार रुपये भाडं दिलं जात होतं.

क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपीही अशाच पद्धतीने भाड्याच्या घरात राहून रेकी करत असे आणि त्यानंतर गोळीबाराची घटना घडवून आणली. आता या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी गुन्हे शाखेची वेगवेगळी पथकं उज्जैन (मध्य प्रदेश), दिल्ली आणि हरियाणा येथे रवाना झाली आहेत. एबीपी न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीCrime Newsगुन्हेगारीNCPराष्ट्रवादी काँग्रेसPunjabपंजाबjailतुरुंग