नवी दिल्ली : मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटकेतील आरोपी चैतन्यानंद याची पोलिस चौकशी करीत असून, त्यातून धक्कादायक माहिती बाहेर येत आहे. त्याला सेक्स टॉयचा नाद होता व त्याच्या खोलीतून ५ पॉर्न सीडी जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. त्याच्या मोबाइल फोनमध्ये एक सीसीटीव्ही मॉनिटरिंग ॲप होते. याद्वारे तो परिसर व वसतिगृहावर नजर ठेवत होता.
त्याने अनेक महिला व कर्मचाऱ्यांची गुप्तपणे छायाचित्रे काढली आहेत. तो त्यांच्यावर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवत होता. त्यांना त्याने पाठवलेले अश्लील संदेश डिलीट करण्यास भाग पाडले होते. यात तीन महिला त्याच्या संस्थेत मोठ्या पदावर होत्या.
चॅटिंगमध्ये नेमके काय?बाबा चैतन्यानंद विद्यार्थिनींशी अश्लील चॅटिंग करीत होता. त्यात तो थेट लैंगिक सुखाची मागणी करीत होता. या चॅटचे काही स्क्रीन शॉटही पोलिसांनी हस्तगत केले आहेत. यावरून त्याच्यावर केलेल्या आरोपांची पुष्टी झाली आहे. तो फरार असल्याच्या कालावधीत उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी दडला होता व विद्यार्थिनींशी चॅट करण्यासाठी त्याने लंडनच्या एका सिम कार्डचा वापर केला होता. फरार असल्याच्या काळात पोलिसांपासून वाचण्यासाठी तो याच सिम कार्डचा वापर करत होता.
कशी करायचा फसवणूक?महिलांना एअरहोस्टेस होण्याचे किंवा त्याच्या संस्थेत पद देण्याचे आमिष दाखवून तो संवादास सुरुवात करीत होता. महिलांना प्रभावित करण्यासाठी त्याने त्याचे कार्यालय एखाद्या पंचतारांकित हॉटेलप्रमाणे केले होते. तो महिलांना महागड्या वस्तू भेट देत होता. त्याने केलेल्या कृत्याचा त्याला पश्चात्ताप होत नसून, पोलिसांना तो चौकशीत वारंवार खोटे बोलत आहे.
Web Summary : Chaitanyanand, arrested for sexual exploitation, possessed sex toys and porn. He monitored his surroundings via CCTV, secretly photographed women, and forced them to delete obscene messages. He lured women with promises of jobs and luxury.
Web Summary : यौन शोषण के आरोप में गिरफ्तार चैतन्यानंद के पास सेक्स खिलौने और पोर्न थे। वह सीसीटीवी से निगरानी रखता था, चुपके से महिलाओं की तस्वीरें लेता था, और उन्हें अश्लील संदेश हटाने के लिए मजबूर करता था। उसने नौकरी और विलासिता के वादे के साथ महिलाओं को लुभाया।