शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लहान भावाने मोठ्याचा केला कुऱ्हाडीने खून; फरारी आरोपीस जंगलातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 02:15 IST

आमगाव शिवपाडा येथील वसंत डोलारे तसेच राजेश डोलारे या शेजारी शेजारी राहणाऱ्या सख्ख्या भावांत जमिनीचा वाद असून त्यांच्यात नेहमीच भांडणे होत असत.

तलासरी : जमिनीच्या वादातून लहान भावानेच आपल्या मोठ्या भावाचा कुºहाडीने धाव घालून निर्घृण खून केल्याची घटना तालुक्यातील आमगाव शिवपाडा येथे शनिवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली. खून करून जंगलात पळालेल्या आरोपी राजेश रूपजी डोलारे यास तलासरी पोलिसांनी रातोरात शोधून गजाआड केले.

आमगाव शिवपाडा येथील वसंत डोलारे तसेच राजेश डोलारे या शेजारी शेजारी राहणाऱ्या सख्ख्या भावांत जमिनीचा वाद असून त्यांच्यात नेहमीच भांडणे होत असत. शनिवारी रात्री मयत वसंत याची मुलगी आशा हिने आपला लहान भाऊ राहुल याची चेष्टा करून त्यास रडविले. यावेळी वसंत याने मुलगी आशा हिला राहुल हा तुला एकटाच भाऊ आहे. त्यास रडवू नको, असे समजावले. याच वेळी वसंत करीत असलेली बडबड आपल्याला उद्देशून आहे, असा समज राजेश याने करून घेतला व रागाने त्याने भाऊ वसंत यास घरातून बाहेर बोलावून घेतले आणि हातातील कुºहाडीने सपासप वार वसंतवर केले. यावेळी गंभीर जखमी झालेला वसंत जागीच ठार झाला. आपल्या हातून भावाचा खून झाला आहे, हे बघताच राजेश जंगलात पळून गेला.

घडलेल्या घटनेची महिती तलासरी पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक अजय वसावे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन तपास करून रातोरात जंगलात लपलेल्या राजेशला शोधून काढून गजाआड केले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मयताची पत्नी मीना वसंत डोलारे हिच्या तक्रारीवरून आमगाव शिवपाडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Murderखून