शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! तलवारीनं पतीचं डोकं केलं धडापासून वेगळं; पत्नीनेच रचला हत्येचा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 21:24 IST

ज्या तलवारीने चंद्रकांत यांची हत्या करण्यात आली होती, ती तलवार ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी चौकशीदरम्यान मालती देवीने आपला गुन्हा कबूल केला आहे.  

ठळक मुद्देसिटी एसपी आर रामकुमार यांनी 28 ऑगस्ट 2020 रोजी चंद्रकांत टुडू यांचा मृतदेह तुकड्यातुकड्यांत आढळून आला. मालती देवीने हत्या केल्यानंतर रात्री 12 वाजता त्याचे धड टोपलीत भरले आणि घरामागे असलेल्या विहिरीत फेकून दिले.

चंद्रकांत टुडू हत्याकांड प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात पत्नीने आपल्या पतीची हत्या केल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी चंद्रकांत यांची पत्नी मालती देवी हिला अटक केली आहे. ज्या तलवारीने चंद्रकांत यांची हत्या करण्यात आली होती, ती तलवार ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी चौकशीदरम्यान मालती देवीने आपला गुन्हा कबूल केला आहे.  सिटी एसपी आर रामकुमार यांनी 28 ऑगस्ट 2020 रोजी चंद्रकांत टुडू यांचा मृतदेह तुकड्यातुकड्यांत आढळून आला. चंद्रकांत यांची पत्नी मालती देवी हिने 27 ऑगस्ट रोजी आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती, अशी माहिती दिली. पुढे त्यांनी सांगितले की, पोलीस चंद्रकांत यांचा शोध घेत असताना घराच्या मागे असलेल्या विहिरीत त्यांचा मृतदेह तीन तुकड्यांत कापलेल्या अवस्थेत आढळला. मृत चंद्रकांत यांचं धड आणि पायचं सापडले होते. मात्र, मृत व्यक्तीचे शीर सापडले नव्हते. यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. या तपासादरम्यान चंद्रकांत यांची पत्नी मालती देवी हिच्याविरोधात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी मालती देवीला ताब्यात घेत तपास सुरू केला. पहिल्यांदा मालती देवीने आपण गुन्हा केल्याचा नकार दिला, मात्र चौकशीदरम्यान तिने आपणच हत्या केल्याची कबुली दिली आणि हकीकत सांगितली.मालती देवीला तीन मुलं आहेत. पती मुंबईत मजुराचे काम करीत होता. या वर्षी जानेवारी महिन्यात तो मुंबईहून परतला होता. त्यामुळे मुलांचा पालनपोषण करणं तिला कठीण जात होतं. ती दारुची विक्री करायची. दारूच्या व्यवसायामुळे तिच्या घरी अनेक लोक येऊ लागले. मात्र, पतीला हे पटत नव्हतं, त्यावरून तो सतत पत्नीसोबत वाद करीत होता. नेहमीच्या वादातून सुटका करण्यासाठी तिने पतीच्या हत्येचा कट रचला.एकेदिवशी चंद्रकांत मित्रांसोबत घराच्या अंगणात बसून मद्यपान करत होता. रात्री 9 वाजता मालती देवी मुलांना झोपवून पतीच्या खोलीत गेली. दरम्यान, धारदार तलवारीने तिने पतीच्या मानेवर जोरदार वार केला. मान म्हणजेच शीर धडापासून वेगळं झालं. त्यानंतर तिने शरीराचे अनेक तुकडे करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाय कापला गेला नाही. त्यानंतर तिने मृतदेहाच्या कमरेवर वार केले आणि धडाचे दोन तुकडे केले.मालती देवीने हत्या केल्यानंतर रात्री 12 वाजता त्याचे धड टोपलीत भरले आणि घरामागे असलेल्या विहिरीत फेकून दिले. तलवारही दुसऱ्या विहिरीत फेकून दिली. त्यानंतर तिने घरात रक्त पडले होते त्याची साफसफाई केली. दुसऱ्या दिवशी पतीचं डोकं एका प्लास्टिकच्या पिशवीत भरुन स्कूटीच्या डिक्कीत ठेवून दूरवर फेकून आली. पोलिसांना तपासादरम्यान ही स्कूटी सापडली. जागरणने याबाबत बातमी दिली आहे.

न्य महत्वाच्या बातम्या...

 

सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार

 

‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’

 

लज्जास्पद! फेस मास्क घालून केले बेशुद्ध अन् केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 

एल्गार प्रकरणी ज्योती जगतापसह तिघांना ४ दिवसांची NIA कोठडी

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक

 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटक