शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

भांडणाच्या रागात दुचाकीस्वाराला दिली जोरदार धड़क, मुजोर रिक्षाचालकला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 19:53 IST

Crime News : देवनार येथील घटना

ठळक मुद्देयाप्रकरणी भा.दं. वि. कलम 307, 279, 336 आणि मोटर वाहन कायदा कलम १८४ (अ) (ब) अन्वये गुन्हा दाखल करून मुजोर रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. 

घाटकोपर मानखुर्द लिंक रोड येथील ईस्टर्न फ्रीवे ब्रिजखाली ही थरारक बदला घेणारी घटना घडली. १७ डिसेंबरला दुपारी १.२० वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून आज याबाबत देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी भा.दं. वि. कलम 307, 279, 336 आणि मोटर वाहन कायदा कलम १८४ (अ) (ब) अन्वये गुन्हा दाखल करून मुजोर रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. तक्रार किशोर काशिनाथ कर्डक (42) हे घाटकोपर येथे राहणारे आहेत. तसेच ते भारताचा मार्क्सवादी लेनन वादी पक्ष (लाल बावटा) या पक्षाचे मुंबई सचिव आहेत. त्यांच्या पायावरून ऑटो रिक्षा क्रमांक एम एच 03 डीसी 73 37 चालकाने नेली. याबाबत किशोर यांनी जाब विचारला असता या घटनेचा राग मनात ठेवून आरोपी रिक्षाचालकाने त्याच्या ताब्यातील ऑटोरिक्षा बेदरकारपणे तसेच जाणीवपूर्वक वेडीवाकडी चालवून फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने ऑटो रिक्षाने किशोर यांच्या मोटार सायकलच्या डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यानंतर किशोर यांना कोणतीही वैद्यकीय मदत न पुरवता तेथून तो पळून गेला. याबाबतचा थरारक व्हिडीओ कालपासून व्हायरल झाला असून याबाबत आज किशोर यांनी तक्रार दाखल केली. 

 

टॅग्स :Arrestअटकauto rickshawऑटो रिक्षाtwo wheelerटू व्हीलरPoliceपोलिस