भांडणाच्या रागात दुचाकीस्वाराला दिली जोरदार धड़क, मुजोर रिक्षाचालकला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 07:52 PM2020-12-24T19:52:56+5:302020-12-24T19:53:31+5:30

Crime News : देवनार येथील घटना

Auto rickshaw driver arrested, who dashed to two wheeler driver in deonar | भांडणाच्या रागात दुचाकीस्वाराला दिली जोरदार धड़क, मुजोर रिक्षाचालकला अटक

भांडणाच्या रागात दुचाकीस्वाराला दिली जोरदार धड़क, मुजोर रिक्षाचालकला अटक

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी भा.दं. वि. कलम 307, 279, 336 आणि मोटर वाहन कायदा कलम १८४ (अ) (ब) अन्वये गुन्हा दाखल करून मुजोर रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. 

घाटकोपर मानखुर्द लिंक रोड येथील ईस्टर्न फ्रीवे ब्रिजखाली ही थरारक बदला घेणारी घटना घडली. १७ डिसेंबरला दुपारी १.२० वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून आज याबाबत देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी भा.दं. वि. कलम 307, 279, 336 आणि मोटर वाहन कायदा कलम १८४ (अ) (ब) अन्वये गुन्हा दाखल करून मुजोर रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. 

तक्रार किशोर काशिनाथ कर्डक (42) हे घाटकोपर येथे राहणारे आहेत. तसेच ते भारताचा मार्क्सवादी लेनन वादी पक्ष (लाल बावटा) या पक्षाचे मुंबई सचिव आहेत. त्यांच्या पायावरून ऑटो रिक्षा क्रमांक एम एच 03 डीसी 73 37 चालकाने नेली. याबाबत किशोर यांनी जाब विचारला असता या घटनेचा राग मनात ठेवून आरोपी रिक्षाचालकाने त्याच्या ताब्यातील ऑटोरिक्षा बेदरकारपणे तसेच जाणीवपूर्वक वेडीवाकडी चालवून फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने ऑटो रिक्षाने किशोर यांच्या मोटार सायकलच्या डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यानंतर किशोर यांना कोणतीही वैद्यकीय मदत न पुरवता तेथून तो पळून गेला. याबाबतचा थरारक व्हिडीओ कालपासून व्हायरल झाला असून याबाबत आज किशोर यांनी तक्रार दाखल केली. 

 

Web Title: Auto rickshaw driver arrested, who dashed to two wheeler driver in deonar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.