शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

भयानक! बॉयफ्रेंडसोबत राहायचं होतं, पैशासाठी दिलीपशी केलं लग्न; 'खूनी' पत्नीचा 'खतरनाक' प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 15:42 IST

दिलीपची पत्नी प्रगती हिने लग्नाच्या अवघ्या १५ दिवसांतच पतीची हत्या केली.

उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात व्यापारी दिलीप यादव याच्या हत्येने लोकांना धक्का बसला आहे. दिलीपची पत्नी प्रगती हिने लग्नाच्या अवघ्या १५ दिवसांतच पतीची हत्या केली. चौकशीदरम्यान प्रगतीला तिचा बॉयफ्रेंड अनुरागशी लग्न करायचं असल्याचं समोर आलं आहे. पण कुटुंबाच्या दबावाखाली तिने दिलीपसोबत सप्तपदी घेतल्या.  लग्नानंतर तिने भयंकर प्लॅन रचला. अनुराग आणि त्याच्या मित्रांना या प्लॅनमध्ये सामील केलं, त्यांना सुपारी देऊन पतीची हत्या केली.

प्रगती आणि अनुराग यांचं अफेअर होतं, दोन्ही कुटुंबांनाही याची माहिती होती. पण त्यांनी प्रगतीचं लग्न जबरदस्तीने मैनपुरीच्या दिलीपशी लावलं. प्रगतीने लग्नानंतर दिलीपला आपल्या मार्गातून काढून टाकण्याचा आणि नंतर अनुरागशी लग्न करण्याचा प्लॅन केला. अनुराग गरीब होता तर दिलीप एका श्रीमंत कुटुंबातील होता. प्रगतीला त्याचे पैसे हडप करायचे होते. प्रगतीच्या मनात होतं की, ती दिलीपच्या पैशाने अनुरागसोबत चांगले आयुष्य जगेल. पण घटनेच्या काही दिवसांनी रहस्य उघड झालं. 

पोलिसांनी प्रगती, अनुराग आणि त्यांच्या एका साथीदाराला अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. दिलीपच्या कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे की त्याची 'खूनी' पत्नी प्रगतीला सर्वात कठोर शिक्षा देण्यात यावी. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मार्च रोजी दिलीप शेतात जखमी अवस्थेत आढळला होता. २१ मार्च रोजी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. 

दिलीपच्या हत्येसाठी प्रगती आणि अनुरागने रामजी चौधरीला २ लाख रुपयांची सुपारी दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. दिलीपला गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. प्रगती आणि दिलीप यांचं लग्न ५ मार्च रोजी झालं होतं. १९ मार्च रोजी दिलीप वर गोळ्या झाडण्यात आल्या. उपचारादरम्यान दिलीपचा मृत्यू झाला. दिलीपची पत्नी प्रगतीने तिचा बॉयफ्रेंड अनुरागसोबत मिळून दिलीपची हत्या केल्याचं तपासात उघड झालं.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नPoliceपोलिस