उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका काकीने पवित्र नात्याची विटंबना करत आपल्या सख्या पुतण्यासोबत घर सोडले आणि पळ काढला. या घटनेमुळे संपूर्ण बेगमपूर करहल परिसरात खळबळ उडाली असून, पीडित कुटुंब प्रचंड धक्क्यात आहे. 'ज्या पुतण्याला मुलाप्रमाणे मानले, त्यानेच घराची अब्रू वेशीवर टांगली', अशी भावना आता व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
बेगमपूर करहल येथील रहिवासी अजित कुमार यांचे आयुष्य सुरळीत सुरू होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरात मोठी उलथापालथ झाली. अजित यांची पत्नी सुमन ही रात्रीच्या वेळी अचानक घरातून बेपत्ता झाली. सुरुवातीला कुटुंबाने विचार केला की ती कोणाकडे तरी गेली असेल, म्हणून त्यांनी सर्वत्र शोध घेतला. पण जेव्हा सत्य समोर आले, तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.
पुतण्यासोबत जुळले होते 'सूत'
तपास आणि चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली की, सुमन एकटी गेली नसून ती तिचा सख्खा पुतण्या हर्षित याच्यासोबत फरार झाली आहे. चाची आणि पुतण्यामध्ये गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध सुरू असल्याची चर्चा आता गावात रंगू लागली आहे. या 'कलियुगी' प्रेमप्रकरणामुळे केवळ एका हसत्या-खेळत्या संसाराची राखरांगोळी झाली नाही, तर नात्यातील पवित्रताही धुळीस मिळाली आहे.
कुटुंबियांना बसला मोठा धक्का
अजित कुमार आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब या फसवणुकीमुळे पूर्णपणे कोलमडून गेले आहे. ज्या पुतण्यावर कुटुंबाने जिवापाड प्रेम केले आणि विश्वास ठेवला, त्यानेच घराच्या मर्यादेचा भंग केल्याने गावकरीही संताप व्यक्त करत आहेत. अशा घटनांमुळे समाजातील कौटुंबिक विश्वासाला तडा जातो, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे.
पोलिसांकडून शोध सुरू
या घटनेनंतर पीडित पतीने कुर्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बेपत्ता झाल्याची नोंद केली असून शोधमोहीम तीव्र केली आहे. पोलीस पथके संशयित ठिकाणांवर छापे टाकत असून, आरोपींच्या मोबाईल लोकेशन आणि सर्व्हिलन्सची मदत घेतली जात आहे. लवकरच दोघांना ताब्यात घेऊन सत्य समोर आणले जाईल, असे पोलीस स्टेशन प्रभारींनी सांगितले.
Web Summary : In Uttar Pradesh, an aunt eloped with her nephew, sparking outrage. The betrayal shattered family trust, leaving the husband devastated. Police are actively searching for the couple, intensifying the investigation to uncover the truth behind this shocking incident.
Web Summary : उत्तर प्रदेश में, एक चाची अपने भतीजे के साथ भाग गई, जिससे आक्रोश फैल गया। इस विश्वासघात ने परिवार का भरोसा तोड़ दिया, जिससे पति तबाह हो गया। पुलिस सक्रिय रूप से जोड़े की तलाश कर रही है, और इस चौंकाने वाली घटना के पीछे की सच्चाई को उजागर करने के लिए जांच तेज कर दी है।