शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Atul Subhash : अतुल सुभाषची पत्नी आणि सासूला होऊ शकते अटक; निकिताच्या घरावर चिकटवली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 12:20 IST

Atul Subhash : अतुल सुभाष प्रकरणाच्या चौकशीसाठी जौनपूर येथील अतुलच्या सासरच्या घरी आले आहेत. मात्र, अतुलच्या सासऱ्यांचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. त्यांच्या घराला कुलूप आहे.

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बंगळुरू पोलिसांची एक टीम यूपीतील जौनपूर येथे पोहोचली आहे. जौनपूर शहरातील खोया मंडी भागात अतुलचं सासरचं घर आहे, जिथे पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया, राहतात. मात्र, पोलीस तेथे पोहोचले असता त्यांना निकिताच्या घराला कुलूप दिसलं. कारण, निकिताची आई निशा आणि तिचा भाऊ अनुराग एक दिवस आधी घराला कुलूप लावून रात्री कुठेतरी बाहेर गेले होते. अशा परिस्थितीत पोलिसांनी घरावर नोटीस चिकटवली आहे.

आज जौनपूरच्या स्थानिक पोलिसांसह बंगळुरू पोलिसांची टीम तपासासाठी बाहेर पडली. शहरात सुमारे ५ किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर या टीमने कोतवाली पोलीस ठाणे गाठलं आणि येथील स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बंगळुरू पोलिसांच्या टीममध्ये चार सदस्य आहेत. यामध्ये एका महिला पोलिसाचाही समावेश आहे. हे सर्वजण अतुल सुभाष प्रकरणाच्या चौकशीसाठी जौनपूर येथील अतुलच्या सासरच्या घरी आले आहेत. मात्र, अतुलच्या सासऱ्यांचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. त्यांच्या घराला कुलूप आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सॉफ्टवेअर इंजिनिअर अतुल सुभाष याच्या आत्महत्येप्रकरणी जौनपूरला पोहोचलेल्या बंगळुरू पोलिसांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर निकिता सिंघानिया आणि निशा सिंघानिया यांच्या घरी नोटीस चिकटवली आहे. नोटीसमध्ये लिहिलं आहे की, बंगळुरूमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात तुमचा जबाब नोंदवून घ्या.

अतुल सुभाषच्या भावाकडून बंगळुरूमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात पुरावे गोळा करून आरोपीचे जबाब नोंदवून अटक करण्याची तरतूद आहे. आरोपींनी पोलिसांसमोर जबाब नोंदवला नाही तर पोलीस त्यांना अटकही करू शकतात. जबाब नोंदवण्यासाठी ३ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

अतुल सुभाष याच्या आत्महत्येप्रकरणी पत्नी निकिता सिंघानियासह सासू निशा सिंघानिया यांनाही आरोपी बनवण्यात आल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत महिलांची चौकशी करण्याच्या तयारीत असताना बंगळुरू पोलिसांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्यालाही सोबत आणलं आहे. सध्या त्यांचा शोध सुरू आहे. पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा, पत्नीचा भाऊ अनुराग आणि पत्नीचा काका सुशील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBengaluruबेंगळूरPoliceपोलिस