बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न; पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या आरोपीला बेड्या
By मनीषा म्हात्रे | Updated: September 3, 2022 18:21 IST2022-09-03T18:20:52+5:302022-09-03T18:21:25+5:30
बनावट नोटा चलनात आणण्याच्या धडपडीत आरोपीला बेड्या ठोकण्यास घाटकोपर पोलिसांना यश आले आहे.

बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न; पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या आरोपीला बेड्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बनावट नोटा चलनात आणण्याच्या धडपडीत आरोपीला बेड्या ठोकण्यास घाटकोपर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी सर्जेराव बाबुराव पाटील( ५५) याला अटक करत अधिक तपास करत आहे.
घाटकोपर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या समोर, सर्वोदय सिग्नल जवळ, ला.ब.शा. मार्ग, घाटकोपर ( पश्चिम ) याठिकाणी पो. ऊ. नि. रफिक मुजावर व प्रकटीकरण पथक यांना मिळालेल्या विश्वसनीय माहिती नुसार २८ ऑगस्ट रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास या परिसरात बनावट नोटा बाजारात आणण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा रचून पाटीलला ताब्यात घेतले. त्याच्याकडून भारतीय चलनी नोटा घेवून आलेल्या इसमास शिताफीने सापळा ५००/- दराच्या एकूण ४० भारतीय बनावट चलनी नोटा मिळून आल्या. सदर बाबत घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवत पोलीस अधिक तपास करत आहे.