शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

तोंडात बोळा कोंबून हातपाय बांधायचा प्रयत्न; महिला डॉक्टरने धाडस दाखवत चोरांशी केले दोन हात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 20:27 IST

The female doctor showed courage : दोन चोरांशी केली एकाकी झुंज अन् एका चोराला पकडले तर एक फरार

ठळक मुद्देडॉक्टर शितल आल्हाट (३५) असे या धाडसी महिलेचे नाव आहे. ती मुंबई चेंबूरची रहिवासी आहेअधिक माहिती नुसार, मुंबई चेंबूर येथे राहणारी डॉक्टर महिला ही सध्या नालासोपारा येथील मैत्रिणीच्या घरी आली आहे.

वसई  - मुंबईतील महिला डॉक्टर नालासोपारा येथील तात्पुरत्या वास्तव्यास आली असताना रविवारी तिच्या राहत्या घरात शिरलेल्या दोन चोरांशी तिने एकाकी झुंज दिल्याची घटना घडली आहे. नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर येथे रविवार दि 30 मे रोजीच्या पहाटे वेळी ही घटना घडली आहे. दरम्यान त्या महिला डॉक्टरने दाखवलेल्या धाडसामुळे चोरांचा प्रयत्न जरी फसला असला तरी यापैकी एका आरोपीला नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टर शितल आल्हाट (३५) असे या धाडसी महिलेचे नाव आहे. ती मुंबई चेंबूरची रहिवासी आहेअधिक माहिती नुसार, मुंबई चेंबूर येथे राहणारी डॉक्टर महिला ही सध्या नालासोपारा येथील मैत्रिणीच्या घरी आली आहे. त्यांच्या घराच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे त्या पंधरा दिवसापूर्वी नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर येथील साई लक्ष्मी बिल्डिंग येथील मैत्रिणीच्या रिकाम्या घरी राहण्यासाठी आल्या होत्या.  तीन महिने त्या या घरात राहणार होत्या. त्यांचे पती हे कामानिमित्त बाहेरगावी असून त्यांची दोन्ही मुले ही आजोळी अहमदनगर येथे गेली होती. 

रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांना अचानक आवाजाने जाग आली, त्यांच्या समोर दोन तरुण हातात सुरा घेऊन उभे होते.  त्याचवेळी हॉलमधील खिडकीची काच सरकवून ते घरात शिरले होते. त्यातील एकाने डॉक्टर शीतल यांच्या तोंडात बोळा कोंबून गप्प राहण्यास सांगितले. तर दुसऱ्या चोराने त्या डॉक्टर महिलेचे हात बांधायचा प्रयत्न केला. मात्र त्या परिस्थितीतही प्रसंगावधान दाखवत त्यांनी दोन्ही चोरांना झुंज देत प्रतिकार केला. अचानकपणे घडलेल्या या झटापटीत ते दोन्ही चोर गोंधळले आणि डॉ. शीतल यांनी सर्वत्र मदतीचा धावा केला खरा मात्र या सर्व गोंधळात ते दोन्ही चोर मुख्य दारातून पळून जाण्यात यशस्वी झाले. परिणामी चोरांनी चक्क जाताना घरातून जास्त काही नाही. मात्र, डॉक्टर शीतल यांचा मोबाईल आणि 5 हजार रुपये घेऊन पोबारा केला.

...आणि एक चोर त्याच बिल्डिंगमधला ; ओळख पटलीविशेष म्हणजे डॉक्टर शीतल यांच्या घरात दोघे चोर शिरले होते. आश्चर्य म्हणजे एक चोर हुसेन शेख  हा त्याच इमारतीत राहतो.या चोराला डॉक्टर शीतल यांनी ओळखले होते.  या प्रकरणी  नालासोपारा पोलीसांनी आरोपी चोरावर गुन्हा दाखल करून आरोपी हुसेन शेख याला अटक केली आहे, तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली. 

टॅग्स :RobberyचोरीArrestअटकVasai Virarवसई विरारdoctorडॉक्टरChemburचेंबूर