शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

धारदार हत्यार डोक्यात मारून खुनाचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 19:57 IST

सिंहगड रस्त्यावरील घटना; जखमी तरुण अनोळखी

ठळक मुद्देअज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल अज्ञात व्यक्तीचे वय अंदाजे ३० वर्षे

पुणे : सिंहगड रस्त्यावरील वडगांव पुलाखाली एका अनोळखी इसमाचा अज्ञात कारणांवरून कोणत्यातरी धारदार हत्याराने त्यास जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले असून, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे हवालदार रुस्तुम शेख यांनी याबाबत फिर्याद दिली असून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजनेच्या सुमारास काही तरुणांना वडगांव पुलाखाली असणाऱ्या दत्तवाडी वाहतूक विभागाच्या कार्यालयामागे पुलाच्या खांबाशेजारी एक अनोळखी इसम गंभीर जखमी अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी तत्काळ सिंहगड रस्ता पोलिसांशी संपर्क साधला असता, पोलीस तात्काळ घटनास्थळी आल्यानंतर त्या गंभीर जखमी अवस्थेत असणाऱ्या अज्ञाताला ताबडतोब ससूनमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. त्या अज्ञात व्यक्तीचे वय अंदाजे ३० वर्षे असून त्यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने त्यास जीवे मारण्याचा उद्देशाने त्याचे डोक्यात मारून त्यास गंभीर जखमी केले असून त्याच्यावर ससूनमध्ये उपचार सुरु असून सध्या त्याला बोलता येत नसल्याने त्याचा नाव, पत्ता समजू शकला नसला तरी आम्ही त्या घटनेचा गांभीर्याने तपास करीत असल्याचे सिंहगड रस्ता पोलिसांनी सांगितले. सदर घटनेचे वृत्त समजताच सहायक पोलीस आयुक्त पी. डि . राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके, सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ननावरे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस