शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 18:13 IST

Suicide Attempt : सोमनाथवर मारामारी आणि पिस्तूल बाळगल्याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.  

डोंबिवली: पत्नीवर चारित्र्याचा  संशय घेऊन भररस्त्यात तिच्यावर चाकूने वार करून पसार झालेला आरोपी पती सोमनाथ देवकर (वय 45) याने राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी सकाळी दत्तनगर येथे घडली. यात सोमनाथ गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

डोंबिवली पुर्वेकडील दत्तनगर येथील गावदेवी मंदिराजवळ राहणा-या सोमनाथने 8 फेब्रुवारीला चारित्र्याच्या संशयातून पत्नी वंदनावर भररस्त्यात चाकूने वार केले होते. यात वंदना गंभीर जखमी झाली. तर सोमनाथने घटनेनंतर पोबारा केला होता. रामनगर पोलीस ठाण्यात सोमनाथ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा पोलीस शोध घेत होते. दरम्यान सोमनाथ रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी आला. घराबाहेर लावलेले कुलूप तोडून तो घरात शिरला व त्याच्याजवळील पिस्तूलाने स्वत:च्या छातीवर गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात सोमनाथ गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीसांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेत त्याला उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

सोमनाथवर याआधीही पिस्तूल बाळगल्याचा गुन्हासोमनाथवर मारामारी आणि पिस्तूल बाळगल्याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पत्नीवर वार करून तो नाशिक येथील जंगलात लपला होता त्यानंतर आज तो सकाळी घरी कोणीही नसताना येऊन त्याच्या जवळील बेकायदेशीर पिस्तूलाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने ही पिस्तूल मध्यप्रदेश येथून आणली असल्याचे त्याने सांगितले. मात्र त्याने ही पिस्तुल कोणाकडून आणि कशासाठी आणली याचा तपास सुरू असल्याची माहीती रामनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांनी दिली. सोमनाथ हा मच्छी, भाजी विक्रीचा व्यवसाय करायचा तसेच खानावळीची देखील कामे करायचा अशी माहीतीही त्यांनी दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकdombivaliडोंबिवली