खळबळजनक! माजी नगरसेवकासह मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 04:12 PM2020-11-17T16:12:26+5:302020-11-17T16:12:57+5:30

Suicide Attempt : नगर परिषदेची अनधिकृत खोकेधारकांविरोधी कारवाई

Attempted suicide of a boy along with a former corporator, police detained the two | खळबळजनक! माजी नगरसेवकासह मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

खळबळजनक! माजी नगरसेवकासह मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देही कारवाई रोखण्यासाठी माजी नगरसेवक रमेश खळे व त्यांचा मुलगा साहिल खळे या दोघांनी इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी प्रसंगावधान राखत या दोघांना ताब्यात घेतले.

चिपळूण : दिवाळीची सुट्टी संपताच येथील नगर परिषद अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी बाजारपेठेत खोकेधारकांविरोधात धडक कारवाई केली. मात्र, ही कारवाई रोखण्यासाठी माजी नगरसेवक रमेश खळे व त्यांचा मुलगा साहिल खळे या दोघांनी इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी प्रसंगावधान राखत या दोघांना ताब्यात घेतले.

कोरोनाच्या परिस्थितीमुळे नगर परिषदेने बाजारपेठेतील  अनधिकृत खोकेधारक व हातगाडीधारकांविरोधातील मोहीम थांबली होती. मात्र काहींनी त्याचा फायदा उठवत मोठी दुकाने मांडली होती. काहींनी तर कायमस्वरूपी बांधकामे केली होती. याविषयी ऐन दिवाळीत मोठी ओरड सुरु होती. अशातच माजी नगरसेवक खळे यांनी शिवनदी पुलानजिक वडापावच्या हातगाडी सोबत 'प्रेमाची चहा' हा नवीन स्टॉल उभारला होता. सोमवारीच काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नगर परिषदने ही कारवाई सुरु केली.

या कारवाईला सुरुवात करताच माजी नगरसेवक खळे हे टपरीच्या शेडवर चढले, तर त्यांचा मुलगा साहिल खडस शॉपिंग मॉल इमारतीवर चढला आणि कारवाई झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला. खळे ज्याठिकाणी उभे होते. तेथून मुख्य विद्युत लाईन गेल्याने त्या लाईनला पकडून आत्महत्या करेन, असा इशारा दिला. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा तत्काळ खंडित करण्यात आला. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. तसेच पोलिसांची मोठी तुकडी तेथे दाखल झाली होती. अखेर पोलिसांनी प्रसंगावधान राखत साहिल खळे याला इमारतीवरून खाली उतरवले व ताब्यात घेतले. त्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून शेडवर उभे असलेले खळे हेही दुपारी २ वाजता शेडवरुन खाली उतरले. त्यानंतर भोगाळे, मध्यवर्ती बस स्थानक व उर्वरित भागात नगर परिषदेची कारवाई सुरुच होती.

Web Title: Attempted suicide of a boy along with a former corporator, police detained the two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.