शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून तरुणावर तलवारीने वार करुन खूनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 21:15 IST

Attempt to murder : सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात;वर्तकनगर पोलिसांची कारवाई

ठाणे: पूर्ववैमनस्यातून आकाश राजभर (२३, रा. सावरकरनगर, ठाणे) या तरुणावर तलवारीने हल्ला करुन त्याच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या सात अल्पवयीन मुलांना वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. यातील अन्य दोन आरोपी महिलांचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सावरकरनगर येथील रहिवाशी राजभर हा २ आॅगस्ट २०२२ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास वडापाव खाण्यासाठी सावरकरनगर येथील जय महाराष्ट्र वडापाव सेंटर येथे गेले होते. त्याचवेळी कविता राठोड ऊर्फ बंबा आणि तिची आई तसेच इतर सात अल्पवयीन मुलांनी संगनमताने पूर्वी झालेल्या भांडणारचा राग मनात धरुन धरून त्याच्या डोक्यावर तलवारीने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात गंंभीर जखमी झालेल्या राजभर याला जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कविता राठोडसह नऊ जणांविरुद्ध याप्रकरणी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात २ आॅगस्ट रोजी रात्री दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रणभिसे यांच्या पथकाने यातील सात कथित अल्पवयीन आरोपींना ३ आॅगस्ट रोजी ताब्यात घेतले. त्यांची भिवंडी येथील बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेPoliceपोलिस