Attempted to burn alive after gangrape, the young girl was on her way home from coaching class | गँगरेप करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, तरुणी क्लासहून परताना घडला धक्कादायक प्रकार 

गँगरेप करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, तरुणी क्लासहून परताना घडला धक्कादायक प्रकार 

ठळक मुद्देइंदोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कोचिंग क्लासहून घरी परतत असताना ही धक्कादायक घटना घडली.

मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका १८ वर्षाच्या मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींचा तरुणीला जाळण्याचा कट अयशस्वी ठरला.

इंदोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कोचिंग क्लासहून घरी परतत असताना ही धक्कादायक घटना घडली. रात्री ९ वाजताच्या सुमारास नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नंतर आरोपींनी तिला चाकूने मारले आणि त्यानंतर तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान पीडित तरुणीने आरडाओरडा केल्याने तेथे काही लोक जमले. त्यामुळे आरोपींनी घटनास्थळाहून पळ काढला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदोरच्या भागीरथपूर परिसरात रेल्वे रुळानजीक दोन नराधमांनी पीडित तरुणीशी जबरदस्ती केली. त्यानंतर आणखी तीनजण तेथे आले आणि त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिची प्रकृती स्थिर असून पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. इंदोर पोलीस याप्रकरणी जबाब नोंद करत असून याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Attempted to burn alive after gangrape, the young girl was on her way home from coaching class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.