पत्नीच्या गळ्याला फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By मुरलीधर भवार | Updated: October 28, 2023 22:02 IST2023-10-28T16:30:33+5:302023-10-28T22:02:39+5:30

पोलिसांनी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Attempt to kill wife by hanging, case filed in police station | पत्नीच्या गळ्याला फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पत्नीच्या गळ्याला फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

डोंबिवली-पत्नीने पतीला काम सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरुन चिडलेल्या पतीने घरातील बेडरुमधील पंख्याच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून पत्नीला फास देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पत्नी पतीच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

खुशाल जाधव याचे तनिषा या तरुणीशी आठ महिन्यापूर्वीच लग्न झाले आहे. हे दोघेही कल्याण पूर्वेतील मलंग रोड परिसरात राहतात. खुशाल हा कामावर जात नाही. घरात असतो. तनिषा हीने त्याला घरातील स्टूल बाजूला ठेवा. त्याठिकाणी मला झाडू मारायचा आहे असे सांगितले. या कारणावरुन खुशाल हा तनिषाशी भांडला. नेहमी काही तरी कामे सांगत असते. मी घरी राहिलेले तुला खुपते असे बोलून खुशालने स्टूल हाती घेतला. त्या स्टूलवर चढून घरातील बेडरुममधील लोखंडी अँगलला दोरी बांधली. तनिषाला त्या स्टूलवर उभे करुन दोरीचा फास तिच्या गळ्यात अडकवला. स्टूल ढकलून तिला फास देण्याचा प्रयत्न केला.

काही वेळेत तनिषा ही दम कोंडला. तेव्हा त्याने तिचे पाय धरुन सपोर्ट दिला. खुशालने हा प्रकार तीन वेळा केला. या घटनेनंतर खुशाल आणि तनिषा गावी गेले. त्यावेळी तनिषाच्या मामाला तिच्या मानेवर काळसर व्रण दिसले. तिच्या मामाने काय प्रकार घडला आहे याची विचारणा केली. तेव्हा तनिषाने घडली हकीगत तिच्या मामाला सांगितली. हे ऐकून मामा देखील हैराण झाला. त्यानंतर तनिषा हिने या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी खुशालच्या विरोधात पत्नीच्या गळ्याला फास लावून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कळताच खुशाल हा जळगावला पळून गेला आहे. त्याच्या शोध घेण्यासाठी पोलिस जळगावला रवाना झाले आहेत. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी गणेश भुवड करीत आहेत.

Web Title: Attempt to kill wife by hanging, case filed in police station