शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत दाम्पत्याला जाळण्याचा प्रयत्न, घराला लावली आग; आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 10:27 IST

सुदैवाने नागरिकांनी तत्काळ आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला असल्याची माहिती मिळत आहे.

भिवंडी :  शहरातील निजामपूर पोलिस ठाण्याच्या कुरेशीनगर परिसरातील एका घरात पतिपत्नी झोपलेले असताना, घराला आग लावून त्यांना जळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. यात पतिपत्नी भाजल्याने जखमी झाले आहेत. आग भडकल्यावर सिलिंडरनेही पेट घेतला. सुदैवाने नागरिकांनी तत्काळ आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला असल्याची माहिती मिळत आहे.

फरिन आसिफ कुरेशी व पती आसिफ कुरेशी असे दोघा जखमींची नावे आहेत. मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान अनोळखी व्यक्तीने घराच्या दरवाजावर पेट्रोल टाकून आग लावून आरोपी फरार झाले. यावेळी हल्लेखोराने घराच्या मागील दरवाजाची बाहेरून कडी लावली होती. आगीने पेट घेत घरात धूर जमा झाल्याने दोघे जागे झाले. त्यांनी दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता,  तो दरवाजा बाहेरून बंद होता. दोघांनी आरडाओरड केल्याने शेजारी जागे होऊन घटनास्थळी धाव घेत आग विझविली. दरम्यान, पतिपत्नी हे आग विझविण्याचा प्रयत्न करत असताना भाजल्याने जखमी झाले आहेत. 

स्थानिकांनी या दोघांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. स्थानिक निजामपूर पोलिस व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

जीवे मारण्याची धमकी परिसरात मादक पदार्थ विक्री करून गुंडगिरी करणारे तौकिर आणि त्याच्या साथीदारांनी ही आग लावल्याचा आरोप जखमी आसिफ यांनी केला आहे. तीन महिन्यांपूर्वी तौकिर आणि त्याच्या साथीदारांनी आसिफ याचा मेव्हणा अनस व त्याच्या कुटुंबीयांना क्षुल्लक वादातून मारहाण केली होती.  या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा मागे घे, नाहीतर तुमचे कुटुंब संपवून टाकू, अशी धमकी आरोपींनी दिली होती. त्या रागातून हे कृत्य केल्याचे सांगत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जखमी आसिफ याने केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfireआग