शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर येथे मुलीच्या प्रियकराला पेटवून देत खुनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 13:01 IST

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथील ऑनर किलिंगचा प्रकारापाठोपाठ हा प्रकार समोर आला असून इंदापूर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी संतोष घोरपडेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..

ठळक मुद्देतरुणाच्या जबाबातून उघड झाला प्रकार

पुणे : मुलीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्यावर तरुणाला धमकी देऊन त्याच्या अंगावर रॉकेल व पेट्रोल ओतून पेटवून देऊन खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार इंदापूरात घडला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथील ऑनर किलिंगचा प्रकारापाठोपाठ हा प्रकार समोर आला असून इंदापूरपोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी संतोष घोरपडेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी किस्मत शब्बीर शेख (वय १९, रा़ टन्नू आडोबा वस्ती, नरसिंगपूर, ता़ इंदापूर) यांनी इंदापूर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ३ मे रोजी टन्नु नरसिंगपूर येथे रात्री दहा वाजता घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किस्मत शेख याचे गावातील एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. हे या मुलीच्या घराच्यांना समजल्यानंतर त्यांनी ३ मे रोजी रात्री शेख याला त्यांच्या घरी बोलावून घेतले. त्याला तूू आमच्या मुलीचा नाद सोड असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर संतोष घोरपडे व इतरांनी त्याचा अंगावर रॉकेल व पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. त्यात शेख हा भाजला असून त्याच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सोलापूरमधील बाजार पोलीस ठाण्यातील पोलिसांनी रुग्णालयात जाऊन शेख याचा जबाब नोंदवून घेतला. त्यात ही बाब पुढे आल्यावर त्यांनी याची नोंद घेतली. हा सर्व प्रकार इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने त्यांनी ती तक्रार इंदापूर पोलिसांकडे पाठवून दिली. इंदापूर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा तिघांविरुद्ध दाखल केला आहे.

टॅग्स :IndapurइंदापूरMurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस