शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक संबंध ठेवण्यावरून झालेल्या वादात गे तरुणांमध्ये खुनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 21:15 IST

दोघा गे तरुणांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यावरुन झालेल्या वादात एकाने झोपलेल्या मित्रावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला़.

ठळक मुद्देशारीरिक संबंध ठेवण्यावरून भांडण : डेटींग साईटवर झाली होती ओळख फिर्यादीवर रुग्णालयात उपचार सुरु अधिक तपासासाठी न्यायालयाने आरोपीला २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर

पुणे : दोघा गे तरुणांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यावरुन झालेल्या वादात एकाने झोपलेल्या मित्रावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला़. तीन वर्षांपूर्वी दोघांची गे डेटींग साईटवर ओळख झाली होती. झोपेत असलेल्या एकाच्या डोक्यावर आणि खांद्यावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला असून खडक पोलिसांनी एकाला अटक केली आहे़ शुक्रवार पेठेत राहणाऱ्या ४६ वर्षाच्या तरुणाने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी पाषाण सुस रोडवर राहणाºया एका २३ वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे़ सुभाषनगर येथे बुधवारी सकाळी ६ वाजता ही घटना घडली़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी तरुणाचे दुचाकीचे शोरुम आहे़. आरोपी हा काहीही कामधंदा करत नसून त्याचा दुसरा गे मित्र त्याचा सांभाळ करतो़. या दोघांची सुमारे ३ वर्षांंपूर्वी गे डेटिंग साईटच्या माध्यमातून भेट झाली होती़. तेव्हापासून दोघेही एकमेकाबरोबर अधून मधून राहतात़. बुधवारी सकाळी हा प्रकार घडला़. त्याच्या अगोदर दोन दिवसांपासून आरोपी फिर्यादीच्या घरी राहत होता़. दिवसभर बाहेर जाऊन आरोपी रात्री त्याच्या घरी येत होता़. मंगळवारी रात्री त्यांच्यात शारीरिक संबंध ठेवण्यावरुन वाद झाला़. त्यानंतर फिर्यादी झोपले असताना आरोपीने त्याच्या डोक्यावर, उजव्या खांद्यावर कोयत्याने अनेक वार केले़ डोक्यावर, चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या असून चेहऱ्याच्या हाडास फ्रॅक्चर झाले आहे़.आपण त्याला मारले नसून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्याने जबरदस्ती करताना तो जखमी झाल्याचे आरोपीचे म्हणणे आहे़ फिर्यादीवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे़. खडक पोलिसांनी खुनाचा प्रयत्न  केल्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपासासाठी न्यायालयाने आरोपीला २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे़. सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक