शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात भर रस्त्यात पादचारी युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न; दोघे गुंड पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 00:08 IST

पंचवटीतील  पेठफाट्यावरून पायी जाणाऱ्या एका २१वर्षीय युवतीचा दुचाकीने पाठलाग करत बळजबरीने तिचा हात धरत ओढून दुचाकीवर बसवून अपहरण करण्याचा गुंडांचा डाव युवतीने आरडाओरड केल्याने उधळला गेला.

नाशिक  :

पंचवटीतील  पेठफाट्यावरून पायी जाणाऱ्या एका २१वर्षीय युवतीचा दुचाकीने पाठलाग करत बळजबरीने तिचा हात धरत ओढून दुचाकीवर बसवून अपहरण करण्याचा गुंडांचा डाव युवतीने आरडाओरड केल्याने उधळला गेला. आपल्या पुतनीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिच्या काकांनी धाव घेत गुंडांच्या तावडीतून तरुणीची सुटका केली. ही घटना रविवारी रात्री (दि.९) पंचवटीतील पेठ फाटा परिसरात घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी, हनुमानवाडी परिसरात राहणारी एक युवती पेठफाटा येथून पायी जात असताना संशयित राम दत्तू सांगळे व इंद्रकुड जाजूवाडीत राहणारा ललित एकनाथ मल्ले यांनी दुचाकीवरून येत युवतीचा पाठलाग सुरु केला. त्यावेळी त्यांनी फिर्यादि युवतीला काहीतरी उद्देशून इशारे केले;मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष करुन पायी चालणे सुरूच ठेवले असता त्यातील एका संशयिताने युवतीचा हात पकडून तिला ओढत जबरदस्तीने दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी युवतीने आरडाओरड केली असता तिच्या काकांनी तत्काळ तिच्या दिशेने धाव घेतली. झटापट करत छेड काढणाऱ्या दोघांना पकडले आणि त्यांच्या तावडीतून युवतीला सोडविले. त्यावेळी त्यांनी तिच्या काकांना शिवीगाळ करून 'पोलिस ठाण्यात घेऊन गेले तर बघून घेऊ' असा दम भरला. त्यानंतर पीडित मुलीच्या काकांनी एका संशयित गुंडाला आवळून पकडून ठेवले तर दुसरा पळून जाण्यास यशस्वी झाला.

नागरिकांनी पोलिसांना माहिती काळविताच घटनास्थळी पोलीस पोहचले आणि त्यांनी एका संशयितास ताब्यात घेत वाहनात डांबले. त्याच्या फरार साथीदारासदेखील रात्री ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघा संशयितांविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात पीडित युवतीने तक्रार अर्ज दिला आहे

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी