मुरबाड : तालुक्यातील धानीवली गावात जमिनीवरून वाद झाल्याने सासूने सुनेला अंगावर डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. याबाबत पीडित शिक्षिका संगीता भोईर हिने मुरबाड पोलीस ठाण्यात सासू, सासरे, दोन दीर व भावजय यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.संगीता या शिक्षिका असून कल्याण येथे राहतात. मूळगावी धानीवली येथे आपले घर असावे म्हणून त्यांनी त्यांच्या वाटणीला आलेल्या जागेत घर बांधणे सुरू केले. त्याठिकाणी गुरुवारी घराचे काम बघण्यासाठी गेल्या असता सासूने घरात बोलावून अंगावर डिझल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.याबाबत तक्रारदारांचे दीर विकास भोईर यांना विचारले असता घटना घडली त्यावेळी आमचे वडील, आम्ही दोघे भाऊ आमच्या पत्नी घरी नव्हतोच. तक्रारदार यांना आम्ही रस्त्याला जागाही सोडली आहे. आम्ही तिघे भाऊ सांमजस्याने जमिनीचा विषय सोडवणार होतो. या घटनेशी आईचाही काही संबंध नसावा. हे सगळे घडवून आणल्यासारखे वाटते, असे सांगितले.
जमिनीच्या वादातून सुनेला जाळण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 03:53 IST