शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न, एक संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 11:13 IST

Crime News: प्रशांत संजय भिसे (वय २८) असे मृत तरुणाचे नाव असून शुक्रवारी सकाळी दानोळी-कोथळी मार्गावरील मंगोबा माळ येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला.

जयसिंगपूर / दानोळी : दानोळी (ता. शिरोळ) येथील बेपत्ता असलेल्या त्या युवकाचा खून झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. पैशाच्या देवाणघेवाणीतून प्रशांत संजय भिसे (वय २८) या तरुणाचा मित्रांनीच धारदार हत्याराने खून करुन मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी दानोळी-कोथळी मार्गावरील मंगोबा माळ येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत प्रशांतचा मृतदेह मिळून आला.दरम्यान, खूनप्रकरणी प्रताप ऊर्फ गुंड्या संजय माने (रा. दानोळी) याला अटक करण्यात आली असून अमोल ऊर्फ दाद्या दत्ता हराळे व सागर अजित होगले या दोघा संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. खुनाच्या घटनेमुळे दानोळी परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत माहिती अशी की, प्रशांत भिसे हा १५ डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास घरातून निघून गेला होता. तो घरी परत न आल्याने त्याचा शोध सुरु होता. गुरुवारी तो बेपत्ता झाल्याची वर्दी जयसिंगपूर पोलिसांत देण्यात आली होती. दरम्यान, दानोळी येथील खर्डेकर सरकार यांच्या विहीरीत प्रशांतची मोटरसायकल आढळून आली होती. मात्र, त्याचा पत्ता लागला नव्हता.शुक्रवारी सकाळी कोथळी येथील मंगोबा देवालयाजवळील रस्त्यालगत त्याचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मिळून आला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजणे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पोलीस पथकाने पाहणी केली. मृत प्रशांत याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नसंशयित आरोपींनी प्रशांतचा खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह पूर्णपणे जळाला नाही. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. याठिकाणीच संशयिताचा डाव फसला.मित्रांनीच केला घातपातबुधवारी रात्री पार्टी करण्याच्या उद्देशाने प्रशांतला घेऊन संशयित आरोपी गेले होते. सर्वांनीच मद्यप्राशन केल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, संशयित व प्रशांत यांच्यामध्ये पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन वाद झाला. त्यातूनच संशयितांनी धारदार हत्यारांनी मित्र प्रशांतचा घातपात केला, अशी तक्रार सुशांत भिसे यांनी पोलिसांत दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर