महाबळेश्वरमध्ये एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 13:51 IST2020-11-25T13:51:16+5:302020-11-25T13:51:26+5:30
मुख्य बाजारपेठच्या प्रवेशद्वार असलेल्या सुभाषचंद्र बोस चौकात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाबळेश्वरमध्ये एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला
महाबळेश्वर : महाबळेश्वर मधील सुभाष चौकामध्ये महाराष्ट्र बॅक ची शाखा आहे. या ठिकाणी मंगळवारी रात्री एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुख्य बाजारपेठच्या प्रवेशद्वार असलेल्या सुभाषचंद्र बोस चौकात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी मध्यरात्री लोखंडी ग्रील कापून अज्ञातांनी प्रवेश केला. तसेच ज्या ज्या भागात सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले आहेत ते कॅमेरे फिरवले. मात्र सुदैवाने मशीन त्यांना फुटले नाही. या घटनेची माहिती सकाळी समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.