शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यावर हल्ला, हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 02:16 IST

Mahad News : महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धनाजी गुरव यांच्यावर शुक्रवारी महाविद्यालयातच प्राणघातक हल्ला करण्यात आला.

महाड -  महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धनाजी गुरव यांच्यावर शुक्रवारी महाविद्यालयातच प्राणघातक हल्ला करण्यात आला. जखमी डॉ.गुरव यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या हल्लेखोरांना पकडण्याच्या प्रयत्न करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यालाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी महेंद्र घारे, महेंद्र वानखेडे यांच्यासह पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्राचार्य डॉ.धनाजी गुरव हे महाविद्यालयातील रूम नं. १५मध्ये असलेल्या सभागृहामध्ये बैठक घेत असताना, अचानक महेंद्र घारे आणि त्याच्या साथीदारांनी लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉड घेत या सभागृहात प्रवेश केला व त्यांनी डॉ.गुरव यांना मारहाण करीत सभागृहातील मालमत्तेचे नुकसान केले. या हल्ल्यामध्ये डॉ.धनाजी गुरव यांच्या हाताला आणि पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी गजानन शिंदे यांनी या हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता,  हल्लेखोरांनी त्यांच्या पाठीतही लोखंडी रॉड मारून दुखापत केली.डॉ.धनाजी गुरव यांनी या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रचार्यपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर इतर लोकांना प्राचार्य होता येत नाही आणि महाविद्यालयाच्या पैशांवर डल्ला मारता येत नाही, याचा राग धरून हा हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी महेंद्र दत्तात्रेय घारे (३३, रा. सुंदरवाडी, महाड), महेंद्र वानखेडे (महाड) या दोघांसह पाच ते सहा व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस हे करीत आहेत.खासगी अंगरक्षक तैनात या महाविद्यालयात अनेक खासगी अंगरक्षक व बाउन्सर तैनात ठेवण्यात आले असून, यामुळे महाविद्यालयात विद्यार्थी तणावाखाली वावरत असल्याची बाब उघडकीस येत आहे. या अंगरक्षक व बाउंन्सरवर दरमहा लाखो रुपये खर्च केला जात आहे. या महाविद्यालयात पदभार स्वीकारण्यासाठी दरवेळी मोठी रस्सीखेच होत असून, प्राचार्यपदासाठी गेली काही वर्षे संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे. या महाविद्यालयात मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असतानाही संस्थेचे व मुंबई विद्यापिठाचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaigadरायगड